मारुती आणणार देशातील पहिली सीएनजी एसयूव्ही, सेफ्टी रेटिंगमध्येही असणार सरस

| Updated on: Jun 19, 2022 | 11:29 PM

मारुती ब्रेझा ही देशातील पहिली सीएनजी एसयूव्ही तर असेलच त्याचबरोबर ती मारुतीची पहिली सनरुफ असणारीही कार असेल. अपकमिंग कारमध्ये हेडलँप, डीआरएल, फ्रंट ग्रील, फॉग लँप केसिंग आणि बंपरमध्ये बदल झालेले पाहायला मिळतील.

मारुती आणणार देशातील पहिली सीएनजी एसयूव्ही, सेफ्टी रेटिंगमध्येही असणार सरस
Follow us on

नवी दिल्ली: देशाील सर्वात मोठी कार निर्माण करणारी कंपनी मारुती सुझूकी (Maruti Suzuki) देशातील पहिली सीएनजी एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मारुती ब्रेझा एसयूव्ही सीएनजी व्हेरिएंटमध्ये (Brezza SUV CNG variant) लवकरच बाजारात येऊ शकते. सध्या देशात एकही सीएनजी एसयूव्ही (CNG SUV) उपलब्ध नाही. मारुती सोडून टाटाचा नेक्सॉन मॉडेलचे सीएनजी व्हेरिएंट आणण्याचा प्लॅन आहे. युझर्सच्या सुरक्षेसाठी मारुती ब्रेझाचे नवे मॉडेल 5 स्टार एनसीएपी सेफ्टी रेटिंगसह (5 star NCAP safety rating) येऊ शकते. अपकमिंग ब्रेझा सीएनजी एसयूव्हीच्या स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सवर एक नजर टाकूयात

नव्या ब्रेझाचे स्पेसिफिकेशन्स

सीएनजी कारच्या जबरदस्त मागणीच्या काळात ब्रेझा फॅक्टरी फिटेड सीएनजी ऑप्शनसह बाजारात येऊ शकते. युझर्सना या गाडीत अर्टिगाप्रमाणे 1.5 लीटर के 15 सी स्मार्ट हायब्रिड इंजिन मिळू शकते. नवे मॉडेल 5 स्पीडज मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्स मिशनसह येऊ शकते. ब्रेझाच्या नव्या सीएनजी व्हेरिएंटची फ्युईल इफिशिअन्सी 25 ते 30 किलोमीटर, प्रति किलो असी असण्याची शक्यता आहे.

मारुतीची पहिली सनरुफ कार

मारुती ब्रेझा ही देशातील पहिली सीएनजी एसयूव्ही तर असेलच त्याचबरोबर ती मारुतीची पहिली सनरुफ असणारीही कार असेल. अपकमिंग कारमध्ये हेडलँप, डीआरएल, फ्रंट ग्रील, फॉग लँप केसिंग आणि बंपरमध्ये बदल झालेले पाहायला मिळतील. तर मागच्या बाजूलाही स्पोर्टी टेल लँप आणि बंपरवर नव्या पद्धतीने ब्रीझा असे लिहिलेले दिसेल.

अपकमिंग ब्रीझाचे फिचर्स

नव्या ब्रेझाच्या बॉडी पॅनेलमध्ये कोणतेही बदल नसतील. नव्य़ा मॉडेलमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणेच इंटिग्रेटेड टर्न सिग्नल, ओआरव्हीएम, ब्लॅक-आऊट पिलर्स, रुफ टेल आणि रियर स्पॉयलर मिळतील. तर आतमध्ये एक मोठी फ्लोटिंग टच स्क्रीन आणि एचयूडी मिळू शकते. मारुती ब्रेझाच्या नव्या मॉडेलच्या टॉप व्हेरिएंटची अनुमानित किंमत सुमारे 12 लाख एक्स शोरुम असण्याची शक्यता आहे.