तुमच्या गाडीतही ट्युबलेस टायर आहे? मग ही माहिती खास तुमच्यासाठीच!

| Updated on: Jun 04, 2023 | 9:43 PM

ट्यूबलेस टायरचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ट्यूब नसते. त्यांच्या मध्यभागी एक विशेष रबर पट्टी असते. टायरच्या शेवटी एक विशेष सील देखील असते, जो टायरमधील हवा रोखुन ठेवतो.

तुमच्या गाडीतही ट्युबलेस टायर आहे? मग ही माहिती खास तुमच्यासाठीच!
कार टायर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आजकाल कारमध्ये ट्यूबलेस टायर (Tubeless tyre disadvantage) मिळणे सामान्य झाले आहे. अनेक ग्राहक स्वतःही त्यांचे ट्यूब टायर ट्यूबलेस टायरने बदलून घेतात. ट्यूबलेस टायरचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ट्यूब नसते. त्यांच्या मध्यभागी एक विशेष रबर पट्टी असते. टायरच्या शेवटी एक विशेष सील देखील असते, जो टायरमधील हवा रोखुन ठेवतो. ट्यूबलेस टायरचा वापर सामान्यतः बाइक, स्कूटर, कार आणि ट्रक यांसारख्या वाहनांमध्ये केला जातो. त्याचा एक मुख्य फायदा म्हणजे या टायरमध्ये ट्यूब नसते, ज्यामुळे टायरचे वजन कमी होते. त्यामुळे वाहनाचे मायलेजही वाढते. मात्र, ट्यूबलेस टायर्सची काळजी घेणे थोडे कठीण असते. आज आपण या टायर्सचे काही तोटे जाणून घेणार आहोत.

ट्युबलेस टायरचे हे आहेत तोटे

पंक्चर: सहसा बाइक आणि कारच्या टायरमध्ये एक ट्यूब असते, जी टायरला पंक्चर होण्यापासून वाचवते. मात्र, ट्यूबलेस टायरमध्ये ट्यूब नसते. ट्यूब टायरमध्ये पंक्चर शोधणे खूप सोपे आहे. मात्र ट्यूबलेस टायर्समध्ये तुम्हाला ते थोडे आव्हानात्मक  वाटू सकते.

किंमत: किमतीनुसार, जर तुम्ही ट्यूबलेस टायर विरुद्ध ट्यूब्ड टायरची तुलना केली तर, ट्यूबलेस टायरची किंमत थोडी जास्त असेल. पण काळजी करू नका, हा अतिरिक्त खर्च तुम्हाला मिळणाऱ्या चांगल्या मायलेजद्वारे वसूल केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

फिट करणे सोपे नाही: टायरला हवा धरून ठेवण्यासाठी अॅलॉय व्हीलवर हवाबंद करणे आवश्यक असल्याने, ट्यूब टायर फिट होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ घेतात. तसेच, यासाठी व्यावसायिक मदतीची आवश्यकता असते अन्यथा आपल्या हातून चाकाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

साइडवॉल: ट्यूबलेस टायरच्या साइडवॉलला पंक्चर झाल्यास जास्त त्रासदायक असते. कारण वॉलवर झालेला पंचर परत परत निघण्याची शक्यता असते. ट्यूब टायरमध्ये अशा परिस्थीतीत तुम्हाला फक्त ट्यूब बदलायची असते. मात्र ट्यूबलेस टायरच्या बाबतीत हा मोठा भूर्दंड ठरू शकतो.