अर्ध जग गाढ झोपेत असताना एलॉन मस्क यांचा अविष्कार; हवेत उडणाऱ्या कारची पहिली झलक जगासमोर, काय आहे खासियत?

अर्ध जग गाढ झोपेत असताना एलॉन मस्क यांनी नवा अविष्कार केला आहे. हवेत उडणाऱ्या कारची पहिली झलक जगासमोर आली आहे. जाणून घ्या खासियत?

अर्ध जग गाढ झोपेत असताना एलॉन मस्क यांचा अविष्कार; हवेत उडणाऱ्या कारची पहिली झलक जगासमोर, काय आहे खासियत?
tesla car
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 12:45 PM

अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार, बॅटरी, ऊर्जा साठवणूक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टेस्लाने त्यांचा नवा अविष्कार जगापुढे सादर केलाय.  एलॉन मस्क यांनी अमेरिकेतील टेक्सास राज्यातील वाको परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात टेस्लाच्या आगामी  ‘रोडस्टर’ कारची पहिली झलक जगाला दाखवली. आतापर्यंत आपण फक्त हवेत उडणाऱ्या कारबाबत कल्पना करत होतो, काही प्रमाणात त्यावर संशोधनही झालंय. या कारची पहिली झलक दाखवताना अर्ध्याजगासह भारतात मध्यरात्र होती.

पण प्रत्यक्ष उत्पादन होऊ शकेल, किंवा वापरण्यालायक असेल असं एकही प्रोडक्ट जगासमोर येऊ शकलं नाही. मात्र, अशक्य वाटणारं हे संशोधन टेस्ला कंपनीने जगासमोर सादर केलंय. टेस्लाच्या आगामी  ‘रोडस्टर’मध्ये हवेत उडण्यासाठी थेट रॉकेट थ्रस्टर्स बसवण्यात आल्याचा दावा कंपनीने केलाय. एरवी अंतराळात जाणाऱ्या रॉकेटमध्ये किंवा अंतराळवीरांसाठी स्वतंत्र्यपणे असे रॉकेट थ्रस्टर्स असलेली उपकरणे असतात. पण मस्क यांच्या या नव्या कारमध्येच स्पेस एक्स कंपनीचे रॉकेट थ्रस्टर्स लावण्यात आले. त्यामुळे ही कार हवेतही उडू शकत असल्याचं कंपनीने सांगितलंय. बॅटरीवर चालणारी ही कार अवघ्या 0.81 सेकंदांत ताशी 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठू शकते.  उत्पादनासाठी तयार होणाऱ्या कारमध्येही ही आकडेवारी प्रत्यक्षात उतरली, तर कामगिरीच्या बाबतीत ही कार इतर कारच्या तुलनेत वेगळ्याच स्तरावर पोहोचू शकते.

Loading...

2 सीटर असलेल्या या आगामी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारच्या तीन आवृत्त्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये परफॉर्मन्स, थ्रस्ट आणि रॉकेट या तीन व्हेरिएंट्सचा समावेश आहे.  या कारमध्ये Compressed Gasचा वापर केला जाणार आहे. कारमध्ये बसवलेले कॉम्प्रेसर्स या वायूचा दाब पुन्हा निर्माण करून यंत्रणा रिचार्ज करण्यासाठी मदत करतील, असा दावा कंपनीने केलाय.  2028पासून या नव्या कारचं उत्पादन सुरू होईल, असं मस्क यांनी यांनी सांगितलंय. या कारच्या उत्पादनाला परवानगी मिळेल का? कारची किंमत किती असेल, ती भारतात येईल का, कार चावण्यासाठी प्रशिक्षण कुठे घेता येईल, असा अनेक प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us