HDFC चे नवीन EV लोन, कारची बॉडी आणि बॅटरीसाठी मिळेल वेग-वेगळे कर्ज

HDFC बँकने फ्लेक्सी इलेक्ट्रीक कार लोन लाँच केली आहे. यात कारची बॉडी आणि बॅटरीसाठी वेग-वेगळे फायनान्सिंग मिळणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार EMI निश्चित करु शकता.

HDFC चे नवीन EV लोन, कारची बॉडी आणि बॅटरीसाठी मिळेल वेग-वेगळे कर्ज
HDFC's New EV Loan
| Updated on: Oct 25, 2026 | 9:48 PM

जर तुम्ही इलेक्ट्रीक कार (EV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतू त्याची जास्त किंमत आणि महिन्या ईएमआय तुमच्या बजेटवर परिणाम करत असेल तर तुमच्यासाठी HDFC बँकेची नवीन स्कीम कामी येऊ शकते. HDFC बँकेने ‘फ्लेक्सी इलेक्ट्रिक कार लोन’ लाँच केले आहे. यामुळे ग्राहक आपल्या गरजेनुसार ईएमआयचा भार निश्चित करु शकतो.
वास्तविक, EV च्या एकूण किंमतीत बॅटरीचा भाग महत्वाचा असतो. त्यामुळे लोकांना अनेकदा पेट्रोल – डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रीक कार खरेदी करण्यासाठी जास्त रकमेची गरज लागते. HDFC बँकेच्या नव्या योजनेत बॅटरीच्या खर्चाला वेगळे करुन लोन चुकवण्याची सुविधा देण्यात येत आहे.

HDFC बँकेचे नवीन EV लोन काय?

HDFC बँकेने EV खरेदी करणाऱ्यासाठी ‘फ्लेक्सी इलेक्ट्रिक कार लोन’ ची सुरुवात केली आहे. या योजनेत कार बॉडी आणि बॅटरीच्या किमतीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात कार्ड दिले जातील.यात बॅटरीसाठी लोनला दीर्घकाळ चुकवण्याचा पर्याय दिला जातो. तसेच बँकेच्या मते ग्राहक आपल्या गरजेनुसार प्रत्येक महिन्याचा ईएमआय ठरवू शकतो.

Loading...

बॅटरी आणि कारच्या बॉडीसाठी वेग-वेगळ्या लोनचा काय फायदा ?

इलेक्ट्रिक कार (EV)ची बॅटरी त्याच्या सर्वात महागड्या पार्टपैकी एक असते. यामुळे कारची सुरुवातीची किंमत वाढते. बँकेचे म्हणणे आहे की नवीन लोक योजनेत बॅटरीचा खर्चाला वेगळे ठेवल्याने ग्राहकांना EMI ओझे नीट विभागण्यास मदत मिळते.

HDFC बँकच्या किती ब्रँचमध्ये सुविधा ?

HDFC बँकेच्यानुसार फ्लेक्सी इलेक्ट्रीक कार लोनची सुविधा देशभरातील ९,७०० हून अधिक शाखात उपलब्ध आहे. ही योजना ईव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ध्यानात घेऊन सुरु करण्यात आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us