CNG कारमध्ये AC सुरू ठेवूनही मिळवा दमदार मायलेज, फक्त या गोष्टी लक्षात ठेवा

CNG कारमध्ये AC सुरु ठेऊन देखील कसं मिळवायचं दमदार मायलेज. फक्त तुम्हाला गाडी चालवताना करावे लागेल हे काम. जाणून घ्या सविस्तर.

| Updated on: Oct 25, 2026 | 2:49 PM
1 / 6
देशभरात उन्हाचा तडाखा वाढत असून, वाहनचालकांना प्रवासादरम्यान एसीचा वापर करणे आवश्यक ठरत आहे. मात्र, CNG कारमध्ये एसी सुरू ठेवल्यामुळे इंधनाचा वापर वाढू शकतो आणि गाडीचे मायलेज कमी होऊ शकते. पण काही सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास मायलेज सुधारण्यास मदत होऊ शकते.

2 / 6

इंजिन ट्युनिंग, CNG किटची तपासणी आणि एअर फिल्टरची स्वच्छता वेळेवर केल्यास कारची कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत होते.

3 / 6

टायरमध्ये कमी हवा असल्यास गाडी चालवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते आणि मायलेज कमी होऊ शकते. त्यामुळे कंपनीने सुचवलेल्या प्रमाणात टायरमध्ये हवा ठेवा.

4 / 6

वारंवार वेग वाढवणे, अचानक ब्रेक मारणे आणि अतिवेगाने गाडी चालवणे टाळा. शक्यतो स्थिर वेग ठेवल्यास इंधनाची बचत होऊ शकते.

5 / 6

एसीमुळे इंजिनवर अतिरिक्त भार येऊ शकतो. त्यामुळे तापमान आरामदायी ठेवा आणि गरजेनुसार एसीचा वापर करा. मात्र, कडक उन्हात प्रवास करताना केवळ मायलेजसाठी एसी बंद करून स्वतःला उष्णतेचा त्रास करून घेऊ नका.

6 / 6

कारमध्ये विनाकारण जड सामान ठेवल्यास इंधनाचा वापर वाढू शकतो. त्यामुळे आवश्यक नसलेले सामान काढून ठेवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us