Mahindra XUV 300 चे पॉवरफुल व्हेरिएंट लाँच, ह्युंदाईच्या या मॉडेलला देणार टक्कर

| Updated on: Oct 07, 2022 | 2:29 PM

दमदार गाड्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा कंपनीने XUV 300 Turbo मॉडेल लॉन्च केले आहे. जाणून घेऊया या गाडीचे वैशिष्ट्य.

Mahindra XUV 300 चे पॉवरफुल व्हेरिएंट लाँच, ह्युंदाईच्या या मॉडेलला देणार टक्कर
महेंद्रा XUV 300
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा (Mahindra) ने भारतीय बाजारात नवीन XUV300 TurboSport लॉन्च केले आहे. याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 12.90 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन 1.2-लीटर टी-जीडीआय टर्बो-पेट्रोल इंजिन एसयूव्हीच्या या नवीन प्रकारात उपलब्ध आहे. याशिवाय, XUV300 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनसह देखील उपलब्ध आहे. महिंद्राने टर्बोस्पोर्ट प्रकारात काही कॉस्मेटिक बदल देखील केले आहेत जेणेकरून ते XUV300 च्या इतर ट्रिम्सपेक्षा वेगळे असेल.

इंजिन पॉवर आणि गिअरबॉक्स

XUV300 TurboSport चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नवीन इंजिन. हे 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे ज्यात आता फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे इंजिन 5,000 rpm वर 130 PS आणि 1,500-3,750 rpm वर 230 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. ओव्हर-बूस्ट फंक्शनसह टॉर्क आउटपुट 250 Nm पर्यंत वाढवला जातो. या इंजिनसोबत फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

महिंद्रा नवीन GDi युनिट तसेच 1.2-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनची विक्री सुरू ठेवेल. तथापि, टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन देखील 6-स्पीड AMT सह ऑफर केले जातील, जे GDi इंजिनमधे देण्यात आलेले आहे.

हे सुद्धा वाचा

वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांच्या बाबतीत, XUV300 TurboSport ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, इलेक्ट्रिक सनरूफ याशिवाय इतर अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, याला चारही चाकांवर डिस्क ब्रेक, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, 6 एअरबॅग्ज, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ABS, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि बरेच काही मिळते.

स्पर्धा

भारतीय बाजारपेठेत, Mahindra XUV300 TurboSport ची टर्बो व्हेरियंटची स्पर्धा  Renault Kiger, Hyundai Venue, Tata Nexon, Nissan Magnite आणि Kia Sonet सोबत होईल.