Diabetes Tips: डायबिटीजमध्ये उपयुक्त आहे हा घटक, कोलेस्ट्रॉलदेखील ठेवते नियंत्रणात

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

Updated on: Oct 02, 2022 | 7:15 PM

मधुमेह ही सध्या गंभीर समस्या बनलेली आहे. यापासून वाचण्यासाठी स्वयंपाक घरातील रोजच्या वापरातील एक घटक उपयोगी ठरू शकतो.

Diabetes Tips: डायबिटीजमध्ये उपयुक्त आहे हा घटक, कोलेस्ट्रॉलदेखील ठेवते नियंत्रणात
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9

मुंबई, मधुमेह (Diabetes) ही एक जागतिक समस्या बनलेली असून काही वर्हांनीं भारत हा मधुमेहींचा देश (Country of Diabetes) म्हणून ओळखला जाईल अशी भीती आहे. मधुमेह बरा होण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. मधुमेह हा आज जगातील सर्वात वेगाने वाढणारा आजार आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (IDF) च्या मते, गेल्या वर्षी जगभरात  6.7 दशलक्षाहून अधिक मृत्यू मधुमेहामुळे झाले होते. हे मृत्यू 20 ते 79 वयोगटातील लोकांचे होते. 2021 पर्यंत, जगभरात 12.11 लाखांहून अधिक मूलं  टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त होते. यातील निम्म्याहून अधिक 15 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यातही भारतीयांची संख्या मोठी आहे. भारतात, 2.29 लाखांहून अधिक किशोर वयीन मुलांना टाइप 1 मधुमेह आहे.

कांद्याचा करा आहारात समावेश

जरी या आजारावर कोणताही इलाज नसला तरी याला नियंत्रणात ठेवल्या जाऊ शकते. मधुमेह असलेले लोकं त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन निर्माण करू शकत नाहीत. नायजेरियातील डेल्टा स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रमुख लेखक अँथनी ओजिह यांनी मधुमेहाबद्दल सांगितले की,

“कांदा ही स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. ज्याचा मधुमेहात पोषक घटक म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. त्यांनी त्यांच्या अभ्यासात सांगितले की, कांद्याचा रस सर्वप्रथम मधुमेही उंदरांवर वापरला गेला.

हे औषध मधुमेहावर कितपत प्रभावी आहे, हे जाणून घेण्यासाठी वजनानुसार उंदरांना 200mg, 400mg, 600mg चा डोस देण्यात आला. त्यामुळे अभ्यासात असे आढळून आले की या उंदरांची साखरेची पातळी 50 ते 35 ने कमी झाली आहे.

तसेच कोलेस्ट्रॉल कमी झाले. संशोधकांनी मधुमेह नसलेल्या उंदरांना औषधे आणि कांद्याचा रस देखील दिला. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात हे उंदीर जास्त वजनाचे असल्याचे आढळून आले. अँथनी ओजिह यांनी शेवटी सांगितले की, याचा अर्थ कांद्याच्या वापराने कोलेस्ट्रॉलही नियंत्रित करता येते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI