व्हॉट्सॲपचे नवीन सुरक्षा फीचर! नाही काढता येणार फोटो-व्हिडिओचा स्क्रीनशॉट 

व्हॉट्सॲप वापरकर्ते स्क्रिनशॉट ब्लॉकिंग फीचरची मोठ्याप्रमाणात मागणी करत होते. आता ते लवकरच उपलब्ध होनार आहे.

व्हॉट्सॲपचे नवीन सुरक्षा फीचर! नाही काढता येणार फोटो-व्हिडिओचा स्क्रीनशॉट 
नवीन अपडेट Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 6:58 PM

मुंबई, व्हॉट्सॲपने (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर (Screenshot blocking feature) आणले आहे. युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हे फिचर सादर करण्यात आले आहे. या फीचरची मोठ्याप्रमाणात मागणी होत होती. कंपनी खूप दिवसांपासून याची चाचणी करत होती आणि आता हे फीचर यूजर्ससाठी उपलब्ध करायला  सुरुवात झाली आहे. सध्या, हे वैशिष्ट्य काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. स्क्रीन ब्लॉकिंग वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते एकदा पहा म्हणून पाठवलेले व्हिडिओ आणि फोटोंचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत.

नवीन व्हर्जन लवकरच होणार उपलब्ध

WABetainfo च्या रिपोर्टनुसार, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने काही बीटा टेस्टर्ससाठी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सॲप व्ह्यू वन्स फोटो आणि व्हिडिओची नवीन आवृत्ती रिलीज करणार आहे.

वापरकर्त्याला स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यापासून प्रतिबंधित करून वापरकर्त्यांची गोपनीयता सुधारणे हा त्याचा उद्देश आहे. सध्या, हे वैशिष्ट्य फक्त काही बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यासाठी यूजर्सला गुगल प्ले स्टोअरवरून व्हॉट्सॲपचे नवीन बीटा व्हर्जन डाउनलोड करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फिचर कसे करेल काम ?

जर एखाद्या वापरकर्त्याने ‘वन विव्ह’  म्हणून फोटो किंवा व्हिडिओ पाठवला, तर ज्या वापरकर्त्याने स्क्रीनशॉट घेतला आहे त्याला एक मेसेज दिसेल, ज्यामध्ये सुरक्षा धोरणामुळे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही असे लिहिलेले असेल. इतकेच नाही तर जर एखाद्या यूजरने थर्ड पार्टी ॲपवरून स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्क्रीन ब्लॅक दिसेल.

फोटो आणि व्हिडीओसाठी फिचर

या फीचरचा फरक चॅटिंगवर पडणार नसून तो फक्त विडिओ आणि फोटोसाठी असेल. त्यामुळे वापरकर्ते चॅटिंगचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं.
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं..
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली.
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्..
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्...
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक.
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.