Sanjay Raut : निवडणुका जाहीर होताच संजय राऊतांनी चेहऱ्यावरचा मास्क उतरवला आणि…
Sanjay Raut : "प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे यावेळी ही लढाई प्रत्येकाची असायला हवी. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी माणूस, महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे जागरुकता, उत्साह आणि आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झालाय. आम्ही मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहोत. भले तुम्ही पैशांचा खेळ खेळा, पण आम्ही आमची लढाई लढणार. इतिहासात नोंद राहिली पाहिजे" असं संजय राऊत म्हणाले.

“महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे तब्येत सुधारायला हवी. तुमच्यासमोर उभा आहे बोलण्यासाठी उद्धवजींची परवानगी घेऊन. काल तारखा जाहीर झाल्या मुंबईसह 29 महापालिकाच्या. अंगात उत्साह संचारलेला आहे. ट्रीटमेंट सुरुच राहिलं. पण ही लढाई मुंबईची मराठी माणसाची शेवटची अस्मितेची अस्तित्वाची म्हटल्यावर. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, परिस्थितीत असो त्याने या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरलं पाहिजे असं आमच्यासारख्याच म्हणणं आहे” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “ज्याने या मुंबईचे अनेक लढे पाहिले, संघर्ष केला. त्यांना स्वस्थ बसता येणार नाही” असं राऊत म्हणाले.
“मुंबईत गेल्या काही दिवसापासून पोस्टर लागलेत मुंबई वाचवण्यासाठी. मराठी माणसाला आवाहन करणारे. त्यावर कोणत्याही पक्षाचे नाव नाही, सरकारला भिती वाटली. त्यांनी एकारात्रीत ती पोस्टकर काढायला लावलीत. का तर अचारसंहिता भंग होतो म्हणून. अचारसंहिता मराठी माणसाला, विरोधी पक्षाला. ही सरकारची लोकं आहेत त्यांना काय?. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते. नगरविकास खात्याचे आदेश निघत होते. विकासाच्या घोषण होत होत्या. मग ते पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग चार वाजता तारखांची घोषणा करतो” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
सत्ताधारी पक्ष 15 लाखांवरच थांबणार आहे का?
“घोषणा करता हा अचारसंहितेचा भंग नाही का?. पैशाच वाटप प्रचंड होणार. 15 लाखाची मर्यादा, 13 लाख, 11 लाख, 9 लाख. मुंबई, नागपूर, पुणे अ मध्ये येतात. त्यांना 15 लाखांची मर्यादा आहे. निवडणूक आयोग खात्रीने सांगू शकतो का? की सत्ताधारी पक्ष 15 लाखांवरच थांबणार आहे. जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत 100 ते 150 कोटी खर्च करतो, त्या सत्ताधारीने पक्षाने नगरसेवक फोडण्यासाठी दोन-दोन, पाच-पाच कोटी खर्च केलेत ते 15 लाखांची खर्च मर्यादा पाळणार आहेत का? त्यासाठी निवडणूक आयोग कोणती यंत्रणा राबवणार आहे? मुंबई मराठी माणसाच्या हातून हिस्कावून घेण्यासाठी जो पैशांचा खेळ चालणार, तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे का?” असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले आहेत.
