AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या एफडीए विभागात गैरप्रकार? थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तो अधिकारी चर्चेत!

FDA : अन्न आणि औषध विभागातील लाचखोरीचे प्रकरण सध्या गाजत असतानाच या विभागातील इतर अनेक गैरव्यवहारही आता उघड होत आहेत. याबाबत आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

सरकारच्या एफडीए विभागात गैरप्रकार? थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तो अधिकारी चर्चेत!
FDAImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 03, 2026 | 8:16 PM
Share

मुंबई : अन्न आणि औषध विभागातील लाचखोरीचे प्रकरण सध्या गाजत असतानाच या विभागातील इतर अनेक गैरव्यवहारही आता उघड होत आहेत. सामान्य जनतेच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात ढिसाळ कारवाई कुणामुळे होतेय हा सुद्धा तपासणीचा विषय असून एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची आणि सत्वर कारवाईची विनंती करण्यात आली आहे.

उल्हास इंगोले या अधिकाऱ्याविरोधात तक्रार

अन्न व औषध विभागातील गैरकारभाराची चर्चा ठळकपणे समोर येण्याला या विभागातील अधिकाऱ्यांनी चालवलेले भ्रष्ट वर्तुळ कारण ठरले आहे. या वर्तुळाच्या केंद्रस्थानी उल्हास इंगोले नामक अधिकाऱ्याच्या उचापती असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे. श्वेता महाले आणि अमोल मिटकरी या दोन आमदारांनी इंगवलेच्या विरोधात कारवाईची केलेली मागणी आणि सभागृहात विभागीय चौकशीचे दिलेले आश्वासन हवेतच विरले असल्याने विभाग ना काम करू शकतोय ना भेसळ रोखू शकतोय अशी भावना व्यक्त होत असून एकाच पदावर वर्षानुवर्षे चिकटून राहणाऱ्या या अधिकाऱ्यावर इतकी मेहेरनजर का? असा थेट सवाल आता उपस्थित झाला आहे.

निवेदनातील महत्त्वाच्या बाबी

मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये इतरही काही बाबी ठळकपणे मांडण्यात आल्या आहेत त्या अशा, दक्षता सह आयुक्तांकडून उल्हास इंगोले याची चौकशी झाली. तरीही, अद्याप अहवाल का सादर झालेला नाही? ते तपासावे. अन्न आणि औषध विभागाचा अधिकारी उल्हास इंगोले हाच प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीत असल्याचा आक्षेप जबाबदारीने विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. तरीही संबंधित व्यक्ती पदावर का ? उ

ल्हास इंगोले याच्या संपत्तीची आणि भ्रष्ट्र कारभाराची चौकशी करण्याची भाजपा आमदार श्वेता महाले यांची मागणी अद्यापही दुर्लक्षित का? उल्हास इंगोले याने मुख्यालय सह आयुक्त (अन्न) हा अतिरिक्त कार्यभार बेकायदेशीरपणे अनेक वर्षे स्वतःच स्वतःकडे घेतला आहे. त्याची चौकशी व्हावी. गेली अनेक वर्षे बदली न होता उल्हास इंगोले एकाच पदावर इतकी वर्षे कसा याची खातेनिहाय चौकशी करून त्यांना पदमुक्त करावे.

महाराष्ट्र पोलिसांना नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत देण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश याने कुठल्या अधिकारात काढला ते तपासावे, असे सवाल उपस्थित करत सदर प्रकरणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि उल्हास इंगोले याच्या कचाट्यातून विभागाला सोडवा अशी मागणीही निवेदनात करण्यात आलेली आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्याच्या तावडीतून सुटल्यास विभाग प्रभावी काम करू शकेल असे मत तक्रारदार सूरज केराप्पा पडवळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून उल्हास इंगोले याच्या अन्न आणि औषध विभागाच्या एकूणच व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तक्रारदार सूरज केराप्पा पडवळकर यांनी केलेली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...