AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातल्या सर्वात स्वस्त 3 बाईक, किंमत फक्त… फीचर्स पाहून चकितच व्हाल!

Cheapest 125cc Bikes : आज आपण देशातील 125cc सेगमेंटमधील सर्वात स्वस्त बाईक्सची माहिती जाणून घेणार आहोत. यात किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि मायलेजचा समावेश असणार आहे.

देशातल्या सर्वात स्वस्त 3 बाईक, किंमत फक्त... फीचर्स पाहून चकितच व्हाल!
Hero BikeImage Credit source: Google
| Updated on: Mar 03, 2026 | 9:00 PM
Share

दररोजच्या प्रवासासाठी अनेकजण चांगल्या दुचाकीच्या शोधात असतात. देशात अनेक 125cc सेगमेंटमधील बाइक्स आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या बाइक्स परवडणाऱ्या किमतीत मिळतात, आणि उत्तम परफॉर्मन्स, चांगले मायलेज आणि स्टायलिश डिझाइनसह येतात. आज आपण TVS Raider 125, Bajaj Pulsar 125 आणि Hero Xtreme 125R या दुचाकींची माहिती जाणून घेणार आहोत. या सर्व बाइक्सची किंमत इतर बाईक्सच्या तुलनेत कमी आहे. या बाईक्सची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि मायलेजबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

TVS Raider 125

TVS Raider 125 ही 125cc सेगमेंटमधील सर्वात परवडणारी बाईक आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 81,950 रुपयांपासून सुरू होते. या बाईकचे टॉप व्हेरिएंट 97,719 रुपये आहे. ही बाइक 124.8cc एअर-कूल्ड इंजिनसह येते, जे 11.38 PS पॉवर आणि 11.2 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकचे मायलेज 56 ते 71.94 kmpl दरम्यान आहे. या बाईकची डिझाइन स्पोर्टी असून यात LED हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि TVS कनेक्ट अॅप सपोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात. ही बाईक 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते.

Bajaj Pulsar 125

Bajaj Pulsar 125 ही कंपनीच्या पल्सर सिरीजमधील एंट्री-लेव्हल बाइक आहे. या बाईकचीएक्स-शोरूम किंमत 81,556 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंट 92,000 रुपयांना मिळते. या बाइकमध्ये 124.4cc DTS-i इंजिन मिळते, जे 11.8 PS पॉवर आणि 10.8 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे मायलेज 50 ते 57 kmpl आहे. या बाईकमध्ये वुल्फ-आय हेडलॅम्प, डिजिटल-सेमी-अनालॉग क्लस्टर आणि 15 लिटर फ्यूल टँक दिला आहे. ही बाईक 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते. फीचर्समध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर्स आणि नायट्रॉक्स सस्पेंशनचा समावेश आहे.

Hero Xtreme 125R

Hero Xtreme 125R ही बाईक अलिकडेच लॉन्च झाली आहे. ही 125cc सेगमेंटमधील सर्वात प्रीमियम बाईक आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 89,300 रुपयांपासून सुरू होते, या बाईकचे टॉप व्हेरियंट 1.04 लाख रुपयांना मिळते. या बाइकमध्ये 124.7cc इंजिन मिळते, जे 11.4 bhp पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकचे मायलेज सुमारे 57 ते 66 kmpl आहे. या बाईकमध्ये LED लाइटिंग, डिजिटल क्लस्टर आणि टॉप व्हेरिएंटमध्ये ABS मिळते. ही बाईक 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते. या बाईकमध्ये वाइड टायर्स, स्प्लिट सीट हे फीचर्स मिळतात.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या