CM Fadnavis: फडणवीस यांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले, जास्तीत जास्त…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीची रणनीती स्पष्ट केली आहे. बहुतांश ठिकाणी भाजप-शिवसेना एकत्र लढणार असून, काही ठिकाणी राष्ट्रवादीही सामील होईल. मुंबई आणि पुण्यात विजयाचा विश्वास व्यक्त करत, फडणवीसांनी मतदार यादीतील त्रुटी आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरही भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्याच्या सद्यस्थितीवर सविस्तर भाष्य केले. निवडणुका वेळेवर व्हाव्यात अशी महायुतीची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या शासनाने केलेल्या कामामुळे जनता पुन्हा संधी देईल आणि महायुतीला कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढतील, तर काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युती दिसेल. पुणे महानगरपालिकेत मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकमेकांसमोर मैत्रीपूर्ण लढत देतील. दोघेही मोठे पक्ष असल्याने एकत्र लढल्यास तिसऱ्याला फायदा होईल, हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडमध्येही अशीच स्थिती राहील. नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांमधील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक गेल्याच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भाष्य केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयानुसार निकाल लागू राहील, असे फडणवीस यांनी नमूद केले. शिवसेनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, शिवसेना शक्यतोवर सर्वत्र महायुतीसोबतच असेल.
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू

