Gunaratna Sadavarte : टन टन टोल टोल… गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून राज ठाकरे यांच्या भाषणाची मिमिक्री
गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या टोल धोरणावरून टीका करत त्यांच्या भाषणाची मिमिक्री केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांना भेटणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत, जिथे ते सर्वपक्षीय खासदारांशी आणि मृत विद्यार्थी शौर्य पाटीलच्या कुटुंबीयांशी भेट घेणार आहेत. शौर्य पाटीलच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी शिक्षकांवर कारवाईची मागणी जरांगे यांनी केली आहे. दुसरीकडे, गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टोलच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा टीका केली आहे. टोलचा मुद्दा कुणाच्याही हिताचा नव्हता, असे सदावर्ते यांनी म्हटले. त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची मिमिक्री करत “टन टन टन टोल टोल टोल” अशा शब्दांत टोला लगावला. राज ठाकरे यांच्या वैचारिक डीएनएवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?

