
भारतात दमदार मायलेज, कमी देखभाल खर्च आणि सहज ड्रायव्हिंग असणाऱ्या कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे या गाड्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. मात्र, आता बाजारात अशी एक एसयूव्ही उपलब्ध आहे जी अनेक कार पेक्षाही जास्त मायलेज देऊ शकते.

ही एसयूव्ही म्हणजे Maruti Suzuki Grand Vitara, जी Maruti Suzuki कंपनीकडून सादर करण्यात आली आहे. ग्रँड विटारामध्ये 1.5 लिटर, 4-सिलेंडर माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले जाते. हायब्रिड पॉवरट्रेनमुळे ही एसयूव्ही उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता देते.

कंपनीच्या माहितीनुसार, या कारचे मायलेज अंदाजे 20 किमी प्रति लिटर ते 28 किमी प्रति लिटरपर्यंत जाते. त्यामुळे मोठ्या आकाराची एसयूव्ही असूनही ती इंधन बचतीत पुढे आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुरुवातीची किंमत सुमारे 10,76,500 रुपये आहे.

ग्रँड विटारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरामिक सनरूफ, एम्बिएंट लायटिंग, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि हेड-अप डिस्प्ले.

सुरक्षेच्या दृष्टीने या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), EBDसह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), 360-डिग्री कॅमेरा, हिल-डिसेंट कंट्रोल आणि ISOFIX चाइल्ड-सीट अँकर्स देण्यात आले आहेत.