मारुती सुझुकी आणत आहे नवीन 7 आसनी MPV, काय आहेत फिचर्स

मारुती सुझुकी तिची नवीन इलेक्ट्रीक कार आणण्याची तयारी करत आहे. ही कार सात आसनी कार असणार असून ती दोन बॅटरी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकते.

मारुती सुझुकी आणत आहे नवीन 7 आसनी MPV, काय आहेत फिचर्स
MARUTI new electric car
| Updated on: Sep 29, 2026 | 4:04 PM

मारुती सुझुकीची नवीन सात आसनी इलेक्ट्रीक कार बाजारात येणार आहे. मात्र, मारुतीची योजना टाटा मोटर्स वा महिंद्र एंड महिंद्रा सारखा इलेक्ट्रीक कारचा मोठा पोर्टफोलियओ तयार करण्याचा नाही. ब्रँडच्या लीस्टमध्ये पुढचे नाव एक इलेक्ट्रीक एमपीव्हीचा आहे. ई-विटाराच्या लाँचिंग नंतर कंपनीने या नव्या कारची तयारी करणे सुरु केले होते. ही कार दिसायला ई-व्हीटारासारखीच असणार आहे. या कारचे इंटर्नल नाव वायएमसी आहे. ज्याला कंपनीने थेट Kia Carens Clavis Electric च्या स्पर्धेत उतवण्याचे ठरवले आहे.

कारमध्ये काय खास ?

मारुती सुझुकीची अपकमिंग इलेक्ट्रीक कारचे अनेक स्पाय शॉट्स आले आहेत. याचे डिझाईन काहीसे ई-व्हीटारा सारखेच आहे. यात ई-व्हीटारा सारखे बोनेट, ए- पिलर,साईड मिरर्स, व्हील आर्च आणि १८ इंचाचे एरो एलॉय व्हील्स असणार असल्याचे म्हटले जात आहे. पाठून या कारचा लूक मारुती सुझुकी एर्टीगा सारखा असणार आहे.

Loading...

या नव्या कारमध्ये एर्टिगासारखे एल-शेप्ड टेल लँम्प्स असतील. एकूण ही कार एक एमपीव्ही असेल परंतू तिचा लूक एका एसयूव्ही सारखा असेल.यामुळे कंपनी जास्त ग्राहकांना आकर्षिक करु शकेल. कारचे इंटेरियर देखील काहीसे ई-व्हीटारा सारखेच असणार आहे.

मारुती सुझुकी वायएमसीमध्ये डॅशबोर्ड, सेंटर कंसोल, डोअर पॅनल्स आणि स्विच देखील मारुती ई-व्हीटारा सारखे असतील. पार्ट शेअरिंगमुळे कंपनी कारची किंमत देखील आकर्षक ठेवू शकेल. मारुतीची ही कार ६ – सीटर आणि ७- सीटर अवतारात येऊ शकते. यात फ्रंट वेंटिलेटेड सीट्स असू शकतात.

फीचर्स, बॅटरी आणि रेंज

याशिवाय या कारमध्ये 10-वे पावर्ड एडजस्टमेंट ड्रायव्हर सीट्स, १०.२५ इंचाचा इफोटेनमेंट सिस्टीम, १०.१ इंचाचा डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि वायरलेस फोन चार्जर मिळू शकतो. कारमध्ये सनरुफ असेल की नाही याची माहिती सध्या मिळालेली नाही. यात क्रुझ कंट्रोल, ७- एअरबॅग आणि ३६० डिग्री कॅमेरा सारखे सेफ्टी फिचर्स देखील मिळतील.

दोन व्हेरिएंट्समध्ये

मारुती सुझुकी वायएमसी दोन व्हेरिएंट्समध्ये येईल. यात १४२ एचपीची पॉवर आणि १९३ एनएम टॉर्कवाली मोटर मिळू शकते. याला पॉवर देण्यासाठी कंपनी ४९ kWh ची एलएफपीची बॅटरी देऊ शकते. ज्याची क्लेम्ड रेंज ४१५ किलोमीटर असेल. तर टॉप व्हेरिएंटमध्ये १७२ एचपीची पॉवर आणि १९३ एनएम टॉर्कवाली मोटर मिळेल. जी ६१ kWh च्या बॅटरीसोबत येईल. या कारची रेंजर ५१५ किमी असण्याचा दावा केला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us