शानदार…जबरदस्त…! मॅटरच्या इलेक्ट्रिक बाइकची जोरदार चर्चा, सिंगल चार्जमध्ये धावते 125 किमी

| Updated on: Mar 02, 2023 | 7:59 PM

मॅटर एनर्जीने भारतात आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. या बाइकचं नाव मॅटर एरा असं ठेवण्यात आलं आहे. गियर असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइट आहे.

1 / 5
मॅटर एरा ही स्ट्रीट फायटर इलेक्ट्रिक बाइक असून आकर्षक डिझाईन आहे. यामध्ये एलईडी लाइटिंग सिस्टीम, ऑटो-कॅन्सलिंग इंडिकेटर, स्प्लिट सीट्स, स्प्लिट ग्रॅब रेल, क्लिप-ऑन हँडलबार देण्यात आलं आहे. ग्रे अँड निऑन, ब्लू अँड गोल्ड, ब्लॅक अँड गोल्ड- रेड आणि ब्लॅक अँड व्हाइट अशा चार ड्युअल टोन रंगांचे पर्याय दिले आहेत. (PS: Matter Energy)

2 / 5
मॅटर एरामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाचा टच डिस्प्ले दिला आहे. याशिवाय पार्क असिस्ट, कीलेस ऑपरेशन्स, ओटीए अपडेट्स यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. त्याच वेळी, टॉप-मॉडेल 5000+ व्हेरियंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. (PS: Matter Energy)

3 / 5
या बाइकमध्ये लिक्विड-कूल्ड, 5kWh बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केली की, 125 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. त्याची लिक्विड-कूल्ड मोटर 10.5kW असून वजन 180 किलोग्रॅम आहे. बॅटरी पॅकचे वजन सुमारे 40 किलो आहे. ई-बाईकमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स आहे. ही बाईक ड्युअल-चॅनल एबीएसने सुसज्ज आहे. (PS: Matter Energy)

4 / 5
मॅटर एरा बाईक मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, कोलकाता आणि अधिक सारख्या मेट्रो आणि टियर 1 शहरांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. कंपनी बॅटरी पॅक आणि ई-बाईकवर 3 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. (PS: Matter Energy)

5 / 5
मॅटर एरा इलेक्ट्रिक बाइक Aera 5000 आणि Aera 5000+ या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 1.44 लाख आणि 1.54 लाख रुपये आहे. ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. (PS: Matter Energy)