Updated Mahindra Thar Roxx: अप्सरा आली… नव्या रूपात आणि नव्या अवतारात महिंद्रा Thar Roxx लवकरच मार्केटमधे!
महिंद्रा लव्हर्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे.महिंद्राची लोकप्रिय पाच दरवाजांची xuv आता नव्या अपडेटमुळे चर्चेत आली आहे. या अपडेटेड suv चे फोटो समोर आले आहेत.

महिंद्रा लव्हर्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे.महिंद्राची लोकप्रिय पाच दरवाजांची xuv आता नव्या अपडेटमुळे चर्चेक आली आहे. या अपडेटेड suv चे फोटो समोर आले आहेत.
नव्या अपडेटेड थारमध्ये अलॉय व्हिल्स आणि DaVinci सस्पेंशन तंत्रज्ञान पाहायला मिळत आहे. यामुळे थारमधला प्रवास आता अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे.
समोर आलेल्या फोटोंमध्ये Thar rox ला दोन रंगाच्या कलरमध्ये नवीन अलॉय व्हिल्स दिसत आहे. या व्हिल्सती रचना तीन दरवाज्यांच्या Thar OG सारखी आहे. यामुळे थारच्या साईड प्रोफाईलला अधिक आकर्षक लुक मिळाला आहे. पण हे अलॉय लूक कोणत्या व्हेरिंएंटमध्ये दिले जाणार आहेत याबाबत महिंद्राने माहिती दिलेली नाही.
या गाडीतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे DaVici सस्पेंशन. हे तंत्रज्ञान यापूर्वी महिंद्राच्या थार OG आणि XUV 7XO मध्येही पाहायला मिळालं आहे. यामध्ये DCx व्हॉल्व्हर आधारित डॅम्पर्सचा वापर केला गेला आहे. रस्त्यावरील खड्डे, उंचवटे आणि अचानक येणारे धक्के अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यासाठी ही यंत्रणा मदत करते.
इंजिनच्या बाबातीत काही बदल झालेला नाही. अपडेटेड थार रॉक्समध्ये आधीप्रमाणे 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लीटर डिझेल इंजिनचे पर्याय कायम राहण्याची अपेक्षा आहे. या इंजिनसोबत मॅन्युअल आणि ऑटोमेकिंग गिअरबॉक्समचे पर्याय मिळतात. तर फोर व्हील- ड्राईव्हची सुविधा निवडक डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
सध्या महिंद्रा थार रॉक्सची एक्स शोरूम किंमत साधारणपणे 12.52 लाख ते 23.52 लाख रूपयांदरम्यान आहे.मात्र नव्या अपडेटनंतर बदल होणार का याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. कंपनीने लाँच तारीख आणि बदलांची माहिती जाहीर केलेली नाही.
सध्या महिंद्रा थार रॉक्सची एक्स-शोरूम किंमत १२.५२ लाख ते २३.५२ लाख रुपयांदरम्यान आहे. मात्र, नव्या अपडेटनंतर किंमतीत बदल होणार का, याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. डीलरशिपवर गाडी दिसू लागल्यामुळे लाँच लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण कंपनीने अद्याप अधिकृत लाँच तारीख किंवा व्हेरिएंटनुसार मिळणाऱ्या बदलांची माहिती जाहीर केलेली नाही.