फुल चार्ज करताच धावेल 146km, एक लाखाच्या आत येते ही Hero ची Electric Scooter

Hero Electric Scooter: जर तुम्हाला एक लाख रुपयांच्या आत हीरो मोटोकॉर्पचा शानदार इलेक्ट्रीक स्कुटर हवी आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या स्कूटरचे नाव Hero Vida VX2 Go असे आहे.

फुल चार्ज करताच धावेल 146km, एक लाखाच्या आत येते ही Hero ची Electric Scooter
Hero Vida VX2 Go
| Updated on: Oct 25, 2026 | 4:44 PM

Electric Scooter under 1 Lakh: वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे तुम्ही इलेक्ट्रीक स्कुटर घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी Hero MotoCorp ची सर्वात स्वस्त स्कूटर दिवाळीसाठी उत्तम ठरले. ही स्कूटर एका सिंगल चार्जवर चांगली ड्रायव्हिंग रेंज देते. या स्कूटरचे नाव आहे Hero Vida VX2 Go आहे. ही स्कूटर तुम्हाला 3.4kWh, 3.1kWh, 2.2kWh आणि 2.2RQ kWh बॅटरीच्या ऑप्शनमध्ये मिळतेय, कंपनी या स्कूटरला 5 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे.

Hero Vida VX2 Go Price

Loading...

हीरो मोटोकॉर्पच्या या इलेक्ट्रीक स्कूटरचा 2.2kWh बॅटरीचा व्हेरिएंट सर्वात स्वस्त आहे. या कंपनीच्या साईटच्या मते हा व्हेरिएंट 79,999 रुपयात (एक्स शोरूम) मिळतोय. किंमतीनंतर तुम्हाला या बॅटरी व्हेरिएंट स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज, टॉप स्पीड, फास्च चार्जिंग टाईम आणि बॅटरी टाईप संदर्भात माहिती घेऊयात..

3.1kWh व्हेरिएंटची किंमत 83,000 रुपये (एक्स शोरूम) आणि 3.4kWh व्हेरिएंटची किंमत 95000 रुपये (एक्स शोरूम) आहे. या स्कूटरची तुलना बजाज चेतक 3001, टीव्हीएस आयक्युब सारख्या मॉडेल्सशी होत आहे.
Hero Vida VX2 Go Range

हीरोच्या या स्कूटरचा 2.2kWh बॅटरी व्हेरिएंट सिंगल चार्जवर 93 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हींग रेंज देतो. याचा टॉप स्पीड 70 kmph आहे. हा व्हेरिएंट 65 मिनिटाच्या फास्ट चार्जिंग टाईम आणि रिमुव्हेबल बॅटरी ऑप्शन सोबत येतो. या स्कूटरचा 3.1kWh बॅटरी व्हेरिएंट एकदा सिंगल चार्जवर 127 किलोमीटरपर्यंत रेंज देतो.

या व्हेरिएंटचा टॉप स्पीड देखील 70 kmph आहे. फिक्स्ड बॅटरी सोबत येणारा या व्हेरिएंटचा फास्ट चार्जिंग टाईम 65 मिनिटांचा आहे. 3.4kWh बॅटरी व्हेरिएंटचा बोलायचे झाले तर हा व्हेरिएंट एकदा फूल चार्ज केला तर 146 किलोमीटरपर्यंतच रेंजर देतो. 70 च्या टॉप स्पीडचा हा व्हेरिएंट 62 मिनिटाच्या फास्ट चार्जिंग टाईम आणि रिमुव्हेबल बॅटरी ऑप्शन सोबत येतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us