Royal Enfield एकमेव इलेक्ट्रीक बाईक, सिंगल चार्जमध्ये धावते, सिंगल चार्ज किती धावते…
Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रीक बाईक Flying Flea C6 ची किंमत तुम्हाला किती आहे हे माहिती आहे का ? ही बाईक सध्या कोणत्या शहरात उपलब्ध आहे ? हीची टॉप स्पीड किती आहे हे सांगा, आज आपणे या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.

Royal Enfield ही कंपनी तुम्हाला माहिती आहे. पण रॉयल इनफिल्डच्या एकमेव इलेक्ट्रीक बाईकचे नाव काय आहे हे माहिती आहे का ? या इलेक्ट्रीक बाईकचे नाव Flying Flea C6 असे आहे. या बाईक चार्ज करण्यास नेमका किती वेळ लागतो. या बाईकमध्ये kWh ची बॅटरी क्षमता दिलेली आहे. ही बाईक सध्या कोणत्या शहरात विक्रीसाठी उपलब्ध आहे ? या बाईकचा टॉप स्पीड किती आणि किंमत नेमकी किती पाहूयात….
रॉयल एनफिल्ड कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 2,79,000 रुपये (एक्स शोरूम) आहे. या किंमतीत ही बाईक बंगलुरु आणि हैदराबादमध्ये मिळते. BaaS प्रोग्रॅमसह या बाईकची किंमत 1,99,000 रुपए (एक्स शोरूम) आहे.
Royal Enfield Flying Flea C6 Range
या बाईकमध्ये 3.91kWh ची बॅटरी क्षमता दिलेली आहे. ही मोटरसायकल एकदा सिंगल चार्जवर 154 किलोमीटरपर्यंत दूर अंतरावर जाऊ शकते. आणि या बाईकची टॉप स्पीड 115km/h आहे. कंपनीच्या साईटवर दिलेल्या माहितीनुसार या बाईकला 20 ते 80 टक्के चार्ज होण्यास केवळ 65 मिनिटे लागतात.
बंगलुरु शहरानंतर आता या शहरात मिळणार
ही बाईक कंपनीच्या Flying Flea सब ब्रँड अंतर्गत मिळते. आधी ही बाईक केवळ बंगलुरुत उपलब्ध होती, परंतू आता या बाईकला हैदराबादमध्ये देखील उपलब्ध करण्यात आले आहे.या बाईकला बार्सिलोना, लंडन, पॅरिस, बर्लिन आणि रोम युरोप अंतर्गत पाच शहरात देखील उपलब्ध आहे.
ब्रेकिंग सिस्टीम
207MM च्या ग्राऊंड क्लिरन्स असलेल्या या इलेक्ट्रिक बाईकमध्ये डिस्क ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे., फ्रंट डिस्क 260 mm आणि रिअर डिस्क 220mm ची आहे. यात 3 सेंसेटिव्हीटी ऑप्शन्ससह ड्युअल चॅनल ABS आणि स्विचेबल रिअर ABS देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक केवल 3.7 सेकंदात झिरो ते 60 चा वेग पकडू शकते.