तुमच्याकडे आहे का सनरूफ असलेली कार ? अशी ठेवा मेंटेन

| Updated on: Mar 19, 2023 | 9:51 AM

तुमच्याकडेही सनरूफ असलेली कार असेल तर त्याची नीट देखभाल करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. त्याने सनरूफची योग्य देखभाल करू शकाल आणि नुकसान होण्यापासूनही वाचवू शकाल.

तुमच्याकडे आहे का सनरूफ असलेली कार ? अशी ठेवा मेंटेन
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : आजकाल, बहुतेक तरुणांना आणि मुलांना सनरूफ (sunroof) असलेली कार आवडते. ज्यामध्ये ते प्रवास करतानाही वर उभं राहून कारमधून डोकं वर काढू शकता आणि गार हवेचा आनंद घेऊ शकतात. सनरूफ कारला असलेली ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक कार निर्मात्यांनी त्यांच्या आलिशान सनरूफ कार (sunroof car) बाजारात आणल्या आहेत. मात्र या सनरूफ असलेल्या कारची योग्य काळजी घेणे, मेंटेनन्स (maintenance) ठेवणे खूप गरजेचे आहे. कारच्या इतर भागांप्रमाणेच सनरूफलाही सर्व्हिसिंगची गरज असते. तुमच्याकडेही सनरूफ असलेली कार असेल तर त्याची योग्य काळजी घेण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या. या टिप्सच्या मदतीने तुम्ही सनरूफची योग्य देखभाल करू शकाल आणि होणारे नुकसान टाळू शकाल.

सनरूफ असे करा मेटेंन

कंपनीच्या सूचनांचे पालन करा

हे सुद्धा वाचा

सनरूफ चांगले राखण्यासाठी अथवा ते योग्य रितीने मेटेंन करण्यासाठी सर्वप्रथम कंपनीने दिलेल्या सूचनांचे पालन करा. त्या सूचना नीट फॉलो केल्यास तुम्ही कारच्या सनरूफचा योग्य वापर करू शकाल.

सनरूफ स्वच्छ ठेवा

तुम्ही सनरूफ वापरत असाल किंवा वापरत नसाल, पण ते वेळोवेळी स्वच्छ करत राहा. सनरूफ हे आतून आणि बाहेरून नीट स्वच्छ ठेवावे. आणि स्वत:च्या मनाने त्याची काळजी घेऊ नका. त्यासाठी केवळ तज्ञांकडूनच त्याचे सर्व्हिसिंग करून घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते.

नियमितपणे वापरा किंवा सनरूफ उघडा

कोणतीही गोष्ट असो वा उपकरण, ते जर बराच काळ वापरात नसेल तर ते खराब होऊ शकते. तुमच्या कारच्या सनरूफलाही हा नियम लागू होतो. म्हणूनच कारचे सनरूफही नियमितपणे उघडले पाहिजे. तरच त्याचे कार्य योग्यरितीने सुरू राहील. जर तुम्ही सनरूफ नियमितपणे उघडले आणि बंद केले तर त्यात काही समस्या आहे का, त्यातून एखादा आवाज येतो की नाही ते तुम्हाला समजू शकेल.

सनरूफवर जास्त भार टाकू नका

बहुतेक गाड्यांमध्ये सनरूफ चांगल्या दर्जाचे असतात परंतु काहीवेळा त्यावर जास्त भार टाकल्याने ते खराब होऊ शकतात. लक्षात घ्या की सनरूफ असलेली कार सनरूफ नसलेल्या कारपेक्षा जास्त भार वाहण्यास सक्षम नसते. त्यामुळे त्यावर जास्त भार टाकणे योग्य नाही, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं.