AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Car : नवीन कार खरेदी करताय? ‘या’ दहा गोष्टी तुम्हाला माहितीच हव्यात…

कारची खरेदी केल्यावर ग्राहकांना तिच्या इंटीरियरपासून एक्सटीरियरपर्यंत लहान मोठी माहिती असणे आवश्‍यक असते.

New Car : नवीन कार खरेदी करताय? ‘या’ दहा गोष्टी तुम्हाला माहितीच हव्यात...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Indianautosblog
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jun 16, 2022 | 1:35 PM
Share

मुंबई : नवीन कार (New Car) खरेदी केल्यानंतर त्याच्या मेंटेनेंसकडे (Maintenance) लक्ष देणे महत्वाचे असते. गाडी सुरुवातीपासून मेंटेन ठेवल्यास गाडीचा परफॉर्मेंस तर वाढतोच शिवाय युजर्सच्या सेफ्टीसाठीदेखील ते आवश्‍यक ठरत असते. आपल्यातील अनेक लोकांना गाडी खरेदी केल्यावर तिचा कशा प्रकारे मेंटेनेंस ठेवायचा याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे नवीन गाडी घेउनही काही वर्षांनंतर गाडीच्या मायलेजसह (Mileage) इतर तक्रारी सुरु होत असतात. कारची योग्य निगा न राखल्याने अनेक समस्या निर्माण होत असतात. कार चांगली मेंटेन ठेवल्यास ती दीर्घ काळापर्यंत उत्तम मायलेज देते. नवीन कारची खरेदी केल्यावर तिची देखभाल कशी राखावी याबाबत काही महत्वाच्या मुद्यांवर या लेखातून चर्चा करणार आहोत.

  1. नवीन कार खरेदी केल्यावर ग्राहकांनी मॅन्यूअलमध्ये कारच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सशी संबंधित माहिती मिळवणे गरजेचे आहे. याला वाचून गाडीसंदर्भात अनेक गोष्टींची माहिती मिळू शकते. ग्राहक स्वत: लहान मोठे रिपेअरिंगदेखील करु शकतात.
  2. गाडी ही पूर्णपणे टायरवर चालत असते. त्यामुळे टायरला काही अडचणी आल्या तर हे लक्षात ठेवले पाहिजे की गाडी रस्त्यावरच अडकून पडेल. त्यामुळे टायर प्रेशरची तपासणी करुन घ्यावी.
  3. कारच्या डॅशबोर्डवर अनेक वॉर्निंग लाइट असतात. कारच्या आत अनेक सेंसर लागलेले असतात. कारमध्ये इंधन कमी असल्यावर कारमधील लाइट त्वरित सिग्नल देतात. त्यामुळे वॉर्निंग लाइटबाबत माहिती ठेवावी.
  4. कारच्या इंधनमध्ये काही अडचणी असल्यास गाडी नीट चालणार नाही. कारच्या इंजिनच्या दुरुस्तीला मोठा खर्च लागत असतो. यासाठी कारमध्ये स्वच्छ इंधन भरण्याला प्राधान्य दिले पाहिजे. वेळोवेळी इंजिनची सफाई करणे आवश्‍यक आहे.
  5. कारमधील बॅटरीची लाइफ मर्यादीत असते. परंतु बॅटरीची व्यवस्थित देखभाल केल्यास बॅटरीची लाईफ वाढविता येणे शक्य असते.
  6. कारच्या ब्रेकचे कार्य सुधारण्यासाठी ब्रेक फ्लूइडची गरज असते. याची कमतरता असल्यास ब्रेक काम करत नाही. यासाठी ब्रेक फ्लूइड लेव्हल तपासून घेणे गरजेचे असते.
  7. आपली कार म्हणजे एक प्रकारे मशिन आहे. मशिनला योग्य पध्दतीने काम करता यावे यासाठी लुब्रिंकेंट्‌सची आवश्‍यकता असते. यासाठी कारमध्ये आइल बदलण्यासोबत आइल फिल्टरदेखील बदलने गरजेचे असते.
  8. कारचे इंजिन स्टार्ट करण्यामध्ये स्पार्क प्लगची महत्वाची भूमिका अअसते. एक प्रयत्नात इंजिन सुरु न होणे, एक्सलेरेशन वर-खाली होणे किंवा मायलेस कमी होणे हे प्लग खराब होण्याचे लक्षण आहे.
  9. कारची योग्य देखभाल दुरुस्ती उत्तम मायलेजसाठी आवश्‍यक असते. खराब ड्रायव्हिंग किंवा कारवर जास्त ओझ लादल्यामुळे याचा मायलेजवर परिणाम होत असतो.
  10. कारमध्ये चांगली हवा खेळती राहण्यासाठी केबिन फिल्टर वेळोवेळी बदलने आवश्‍यक असते. त्यामुळे तुमची कार कूल राहण्यास मदत होत असते. कारमधील एसीचे नीट काम न करणे केबिनच्या एअर फिल्टरच्या खराब असण्यास होउ शकते.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश