Budget 2021: यंदाचा बजेट मेड इन इंडिया टॅबमधून; खासदारांना पेन ड्राईव्हमध्ये मिळणार बजेट

| Updated on: Feb 01, 2021 | 10:35 AM

अवघ्या तासाभरात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. (Budget 2021-22: FM Sitharaman to present 'paperless' Budget at 11 am)

Budget 2021: यंदाचा बजेट मेड इन इंडिया टॅबमधून; खासदारांना पेन ड्राईव्हमध्ये मिळणार बजेट
Follow us on

नवी दिल्ली: अवघ्या तासाभरात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्र सरकारने पेपरलेस कारभार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प सादर होणार आहे. मेड इन इंडिया टॅबद्वारे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. खासदारांनाही पेन ड्राईव्हमध्येच यंदाचा बजेट देण्यात येणार असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचललं गेलेलं हे पाऊल आहे. (Budget 2021-22: FM Sitharaman to present ‘paperless’ Budget at 11 am)

निर्मला सीतारामन आज संसदेत 2021-2022 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर संसदेत पोहोचले आहेत. आधी मंत्रिमंडळाची बैठक होईल. त्यानंतर संसदेत बजेट सादर करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे पेपरलेस बजेट

कोरोना संकटामुळे सरकारने पेपरलेस बजेटची घोषणा केली होती. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच बजेटची कॉपी छापण्यात आलेली नाही. मोदी सरकारने देशात डिजिटलीकरणावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा बजेट पाहिला जात आहे.

दोन राज्यांपासून सुरुवात

यापूर्वी दोन राज्यांनी डिजिटल बजेट सादर केला आहे. उत्तराखंड आणि आसाममने ई-बजेट सादर केला होता. सामान्य जनतेपर्यंत बजेट पोहोचावा ई-बजेट मागचा उद्देश आहे.

पूर्वी ब्रीफकेस आणली जायची

पूर्वी चामड्याच्या ब्रीफकेसमधून बजेट आणला जायचा. मात्र, निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढली. त्यांनी वहीखाते घेऊन जाण्याची परंपरा सुरू केली होती. त्याशिवाय 2016मध्ये रेल्वे बजेटचा सर्वसाधारण बजेटमध्येच समावेश करण्यात आला. पूर्वी रेल्वे बजेट स्वतंत्रपणे मांडला जायचा. तसेच बजेटची तारीख 28 फेब्रुवारीवरून 1 फेब्रुवारी करण्यात आली.

अॅपची निर्मिती

सरकारने डिजिटल बजेट सादर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा बजेट जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी ‘Union Budget Mobile App’ची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे सामान्य लोकांनाही बजेट पाहता, वाचता येणार आहे. (Budget 2021-22: FM Sitharaman to present ‘paperless’ Budget at 11 am)

 

संबंधित बातम्या:

Stock Market Update : अर्थसंकल्पाची घोषणा होताच शेअर बाजार उसळणार, काय असेल चाल?

Budget 2021 | निर्मला सीतारमण यांच्या पेटाऱ्यात मनोरंजन जगतासाठी काय?

Budget 2021: काय स्वस्त होणार आणि काय महागणार?

(Budget 2021-22: FM Sitharaman to present ‘paperless’ Budget at 11 am)