Gold Silver Rate Today | सोने-चांदीच्या भावात चढउतार, मुंबईसह चार शहरांचे दर काय?

| Updated on: Jan 25, 2021 | 8:42 PM

दररोज सकाळ संध्याकाळी सोने चांदीच्या भावात चढ उतार होत असतात. (Gold Silver Rate Today Update)

Gold Silver Rate Today | सोने-चांदीच्या भावात चढउतार, मुंबईसह चार शहरांचे दर काय?
Gold and Silver
Follow us on

मुंबई : सोने चांदीतील गुतंवणूक ही सर्वात सुरक्षित समजली जाते. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात (Gold Silver Rate Today) चढउतार पाहायला मिळत आहेत. कोरोना लसीची बातमी आणि अमेरिकन अध्यक्षांच्या झालेल्या निवडीनंतर या घटनांचा सोने चांदीच्या भावावर परिणाम पाहायला मिळत आहे. दररोज सकाळ संध्याकाळी सोने चांदीच्या भावात चढ उतार होत असतात. (Gold Silver Rate Today Update)

आज संध्याकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा फ्युचर्स व्यापार 68.00 रुपयांनी घसरुन 49,072 इतक्यावर बंद झाला. तर चांदीचा फ्युचर्स व्यापार 168.00 रुपयांच्या वाढीसह 66,810 इतके रुपये झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज अमेरिकेत सोन्याचे दर 1,855.96 डॉलर प्रति औंसच्या दराने होत आहेत. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रति औंस 0.17 डॉलर वाढीसह 25.64 डॉलर प्रति औंस इतका होता.

राज्यातील टॉप चार शहरांमधील सोने चांदीचे दर काय?

मुंबईतील सोने चांदीचे दर 

22ct सोने : 48, 330 रुपये

24ct सोने : 49, 330 रुपये

चांदीचे दर : 66700 रुपये (प्रतिकिलो)

पुणे सोने चांदीचे दर 

22ct सोने : 48, 330 रुपये

24ct सोने : 49, 320 रुपये

चांदीचे दर : 66700 रुपये (प्रतिकिलो)

नाशिक सोने चांदीचे दर 

22ct सोने : 48, 330 रुपये

24ct सोने : 49, 330  रुपये

चांदीचे दर : 66700 रुपये (प्रतिकिलो)

नागपूर सोने चांदीचे दर 

22ct सोने : 48, 330 रुपये

24ct सोने : 49, 330  रुपये

चांदीचे दर : 66700 रुपये (प्रतिकिलो)

MCX वरील सोन्याचा दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण

दुसरीकडे आज एमसीएक्सवरील सोन्याचा दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी कमी झालाय, परंतु यावेळी त्यात किंचित घट नोंदवली गेलीय. 5 फेब्रुवारीला डिलिव्हरच्या सोन्याचा दर 15 रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्राम 49155 रुपये झालाय. एप्रिलच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा वितरण दर यावेळी 38 रुपयांच्या घसरणीसह प्रति दहा ग्रॅम 49260 रुपयांच्या पातळीवर होता. आज सकाळी 4 रुपयांच्या घसरणीसह 49,294 रुपयांच्या पातळीवर सोने उघडले. गेल्या आठवड्यात त्याची बंद किंमत 49,298 रुपये होती. यावेळी चांदी वाढताना दिसत आहे. मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा दर यावेळी 174 रुपयांच्या वाढीसह 66,816 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होता. आज सकाळी चांदीचा दर 254 रुपयांच्या वाढीसह 66,896 रुपयांच्या पातळीवर उघडला.

पाटणा, जयपूर, लखनऊ आणि सूरत येथे आज सोन्याचा दर

गुड रिटर्नच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम किंमत अनुक्रमे हैदराबादमध्ये 45940 रुपये, पुण्यात 48320 रुपये, अहमदाबादमध्ये 49430 रुपये, जयपूर आणि लखनऊमध्ये 48080 रुपये, पाटणामध्ये 48320 रुपये आणि सूरतमध्ये 49430 रुपये आहेत. सूरतमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50430 रुपये, पाटण्यात 49320 रुपये, लखनऊ आणि जयपूरमध्ये 52450 रुपये, अहमदाबादमध्ये 50430 रुपये, पुण्यात 49320 रुपये आणि हैदराबादमध्ये 50120 रुपये आहे. (Gold Silver Rate Today Update)

संबंधित बातम्या : 

Money Making Tips: करोडपती होण्याचा सोपा मार्ग, दिवसाला 30 रुपये गुंतवून व्हा मालामाल

प्रजासत्ताकाच्या आदल्यादिवशीही पेट्रोल महाराष्ट्रात महागडच; सर्वाधिक भाव नांदेड, परभणीत