Sunil Mittal: ‘अजून 20 वर्षांनी तरुण असतो तर…’, भारताचा विषय निघताच सुनील मित्तल असे म्हणाले का?

Bharti Airtel Sunil Bharti Mittal: भारती एंटरप्राइजेजचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांनी भारतातील तरुणाई, तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्र आणि सर्वात मोठी बाजारपेठेमुळे लवकरच आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा दावा केला. येत्या 20 वर्षांत मोठा बदल घडणार असल्याचे ते म्हणाले.

Sunil Mittal: अजून 20 वर्षांनी तरुण असतो तर..., भारताचा विषय निघताच सुनील मित्तल असे म्हणाले का?
भारती एंटरप्राइजेजचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांचे मोठे वक्तव्य
| Updated on: Oct 16, 2026 | 9:55 AM

Bharti Airtel Sunil Bharti Mittal: आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत लवकरच मोठी झेप घेणार आहे. देशातील तरुणाई, तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्र आणि सर्वात मोठी बाजारपेठेमुळे लवकरच भारत, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. आगामी 10 ते 20 वर्षात भारत झपाट्याने प्रगती करणार आहे. देशात अफाट व्यावसायिक संधी निर्माण होतील. हे पाहण्यासाठी मी अजून तरूण, 20 वर्षांनी लहान असायला हवा होतो, असे भावनिक उद्गार भारती एंटरप्रायजेसचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांनी काढले. त्यांच्या या वक्तव्याची व्यावसायिक, उद्योजक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगाचं ग्रोथ इंजिन ठरल्याचा दावा जगातील दिग्गज संस्था करत आहेत. पण विरोधकांनी जीडीपीवर अविश्वास दाखवला आहे. जर विकास दर वधारला तर महागाई का कमी होत नाही असा विरोधकांचा रोख आहे. त्यात मित्तल यांच्या वक्तव्याने नव्या समीकरणाची पेरणी केली आहे.

काय म्हणाले सुनील मित्तल?

Loading...

नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात सुनील भारती मित्तल यांनी भारताच्या विकासावर आणि उज्ज्वल भविष्यावर मोठे भाष्य केले. त्यांनी भारत तिसरी आर्थिक महासत्ता होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आजच्या काळात या देशात जन्म घेणे हा खरोखरच एक अद्भूत अनुभव असल्याचा दावा त्यांनी केली. “मी येत्या 10 दिवसांत 69 वर्षांचा होत आहे. परंतु, मला मनापासून असे वाटते की, मी जर अजून 20 वर्षांनी लहान असतो. तर किती बरं झालं असतं. कारण येत्या 10 ते 20 वर्षात या देशात इतकं काही अफाट आणि अभूतपूर्व असं काही घडणार आहे की, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल”, असे ते म्हणाले.

भारताच्या विकासाची चाकं कोण?

सुनील मित्तल यांनी गुरुवारी नवी दिल्लीत गोल्डमॅन सॅक्सच्या ‘10,000 महिला’ या कार्यक्रमात आपले विचार मांडले. भारताकडे उमदा तरूण वर्ग आहे. तरुणांची मोठी लोकसंख्या ही जमेची बाजू आहे. प्रगत तंत्रज्ञान आहे. ऊर्जेची उपलब्धता आणि सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हीच भारताच्या विकासाची चाकं असल्याचे नमूद करत आगामी काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रात देश जागतिक स्तरावर मोठी मजल मारणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तुमच्या कल्पनांवर गाढ विश्वास ठेवा

त्यांनी यावेळी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाच्या आठवणी जागवल्या. त्यांनी नवउद्योजकांना मोलाचा सल्ला दिला. तुमच्या कल्पनांवर आणि महत्त्वकांक्षांवर गाढ विश्वास ठेवा. तुमच्या विचारासोबत आणि योजनेसोबत प्रामाणिक राहा. हा दृढनिश्चिय तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कल्पनेपेक्षा कैक पटीने अधिक यश मिळेल असा मंत्र सांगायला सुनील मित्तल विसरले नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us