महानगर गॅसचा तात्काळ प्रभावाने मोठा निर्णय, या ग्राहकांची होणार कोंडी

इंधनाचा तुटवडा आणि पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. याच पार्श्वभूमीवर, महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने व्यावसायिक पीएनजी आणि सीएनजी ग्राहकांसाठीच्या सर्व अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे वाहतूक आणि उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसेल.

महानगर गॅसचा तात्काळ प्रभावाने मोठा निर्णय, या ग्राहकांची होणार कोंडी
| Updated on: May 26, 2026 | 8:36 AM

अमेरिका -इराण यांच्यातील तणाव, होर्मुजची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकंट निर्माण झाला. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतासह जगभराती अनेक देशांत इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. आखाती देशांमधून होणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने भारतावर संकट घोंगावताना दिसत आहे. गेल्य काही महिन्यांपासूनच भारतात पेट्रोल, डिझेल, तसेच एलपीजीचा तुटवडा जाणवतोय. त्यातच ंधनाच्या दरात वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य लोकांच्या खिशावर मोठा परिणाम होतोय. गेल्या 12 दिवसांत इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून लोकांचं बजेट कोलमडलं आहे.

तर दुसरीकडे एलपीजीच्या दरातही वाढ झाल्याने, खिशावरभार पडत आहे. याचदरम्यान आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) व्यावसायिक पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) ग्राहकांसाठी सुरू असलेल्या सर्व अनुदान व आर्थिक सहाय्य योजना तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. याचा मोठा परिणाम अशा ग्राहकांवर होणार आहे, ज्यांना पूर्वी पाइपलाइन बसवण्यावर आणि बिलांवर सवलत मिळत होती.

काय आहे कारण ?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्याची भू-राजकीय परिस्थिती आणि त्याचा जागतिक ऊर्जा क्षेत्रावर होणारा वाढता परिणाम यामुळे इंधन पुरवठा व किमतींवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. याचपार्श्वभूमीवर व्यावसायिक ग्राहकांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य सुरू ठेवणे शक्य नसल्याचे एमजीएलने स्पष्ट केले. मात्र असं असलं तरीही पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील आणि ग्राहकांना सुरक्षित व विश्वसनीय गॅस सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असंही कंपनीने नमूद केलं.

कोणावर होणार परिणाम ?

महानगर गॅस लिमिटेडने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम वाहतूक क्षेत्र, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्योग तसेच दैनंदिन कामकाजासाठी पीएनजी (PNG) आणि सीएनजीवर (CNG) अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांवर होण्याची शक्यता आहे. त्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो.

सध्याची भू-राजकीय परिस्थिती आणि तिचा ऊर्जा क्षेत्रावरील परिणाम हेच या निर्णयामागचे कारण असल्याचे कंपनीने सांगितलं. ” जागतिक भू-राजकीय घडामोडींशी निगडित इंधन पुरवठा आणि किमतींवरील वाढत्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे ” असं एमजीएलने म्हटलं आहे. व्यावसायिक ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सर्व आर्थिक सहाय्य योजना तात्काळ प्रभावाने बंद करणे कंपनीला “भाग पडले” आहे, असंही कंपनीने नमूद केलंय. त्यामुळे मोठी खळबळ माजली असून त्याचा लोकांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.

 

Follow Us