EPFO Pension Rule: दोन पत्नीपैकी कुणाला मिळेल EPFO पेन्शन, जाणून घ्या तो नियम?
EPFO Pension Rule: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कुटुंबाला निवृत्ती वेतन देण्यात येते. पण जर दोन पत्नी असतील तर कोणत्या पत्नीला मिळणार पेन्शन? याविषयीचा काय आहे तो महत्त्वाचा नियम?

EPFO Pension Rule: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनंतर्गत (EPFO) कुटुंबाला निवृत्ती वेतन देण्यात येते. पण जर कर्मचार्याला दोन पत्नी असतील तर पहिल्या अथवा दुसर्या, कोणत्या पत्नीला पेन्शन मिळते याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आहे. ईपीएफओच्या कर्मचारी निवृत्ती योजना 1995 (EPS-95) मध्ये वारसदार आणि निवृत्ती वेतनाचे नियम कडक आहेत. जर एखाद्या ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या दोन पत्नी असतील. तर पेन्शन कुणाला मिळणार असा मोठा सवाल समोर येतो. वारसदार कुणाला नेमले यावर हे अवलंबून असते. कायदेशीर वारसदाराला ईपीएफओ प्राधान्य देते.
कायदेशीर वैधता आणि ईपीएफओचे धोरण
ईपीएफओच्या नियमानुसार, पेन्शनचा लाभ केवळ त्याच्या पत्नीला मिळतो. जर दोन अथवा त्यापेक्षा अधिक पत्नी असतील तर कायद्यानुसार जिचे वारस म्हणून ओळख आहे. कायद्याच्या व्याख्यात जी वैध ठरते. तिला पेन्शन रक्कम मिळते. हिंदू विवाह अधिनियमातंर्गत पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करणे हे बेकायदेशीर आहे. जोपर्यंत पहिल्या पत्नीकडून घटस्फोट घेतल्या जात नाही. अथवा तिचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत दुसऱ्या पत्नीला कायदेशीर हक्क मिळत नाही. अथवा पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय दुसऱ्या पत्नीला हा हक्क मिळत नाही.
जर कर्मचार्याने दुसर्या पत्नीला वारस म्हणून नेमले तरी प्रश्न सुटत नाही. पहिल्या पत्नीला कायदेशीर वारस म्हणून या पेन्शन रक्कमेवर हक्क सांगता येतो. पहिली पत्नी पेन्शन क्लेम करू शकते. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यास अथवा कायदेशीर घटस्फोट झाल्यास दुसर्या पत्नीला पेन्शनचा संपूर्ण लाभ मिळतो.
दोन्ही पत्नीत पेन्शनची वाटणी?
काही विशेष प्रकरणात, जिथे धार्मिक कायदे आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ आहेत. ज्या परंपरा एकापेक्षा अधिक विवाहाला मान्यता देतात. तिथे ईपीएफओ नियमात बदल होतो. जर कर्मचाऱ्याच्या मृत्यूवेळी एकाहून अधिक कायदेशीर वैध पत्नी असतील. तर पेन्शन रक्कम त्या पत्नींमध्ये समान रुपाने वाट्याला जातो. पण नियमानुसार, पेन्शन मिळण्याचा पहिला हक्क हा पहिल्या पत्नीला आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर जर दुसरी पत्नी नसेल तर ही रक्कम कर्मचार्यांच्या मुलांना मिळते. ही रक्कम त्यांना वयाच्या 25 व्या वर्षांपर्यंत मिळते.
e-Nomination ची सुविधा
ईपीएफओ नेहमी सदस्यांना e-Nomination प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देते. त्यामुळे भविष्यात कुटुंबाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. कुटुंबाच्या व्याख्येत पत्नी आणि मुलांचा समावेश असतो. जर कर्मचाऱ्याने कुटुंबाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीलाही वारस केले असेल तरी कायदेशीरदृष्ट्या वारसादारांचा हक्क पहिला असतो. कर्मचाऱ्याचे कायेदशीर वारस पेन्शनसाठी अगोदर पात्र समजण्यात येतात. त्यांना रक्कम मिळते. अविवाहित कर्मचारी आई-वडिलांना वारस म्हणून नेमू शकतात.