SBI कडून आता झटक्यात मिळणार कर्ज! UPI पेमेंटच्या मदतीने आणला नवा ऑप्शन; नेमकी अट काय?

SBI UPI Loan : छोट्या व्यापाऱ्यांना कमी वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया नव्या UPI आधारित कर्ज योजनेवर काम करत आहे. या योजनेत नियमित UPI व्यवहारांचा डेटा कर्जासाठी पात्रता ठरवताना महत्त्वाचा ठरू शकतो.

SBI कडून आता झटक्यात मिळणार कर्ज! UPI पेमेंटच्या मदतीने आणला नवा ऑप्शन; नेमकी अट काय?
Sbi Loan News
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 4:06 PM

स्टेट बँक ऑफ इंडियाने आता एक नवी कर्ज योजना सुरु करण्याचे ठरवले आहे. या योजनेतून कमीत कमी वेळेमध्ये यूपीआयचा वापर करणाऱ्या ग्राहकांना कर्ज मिळणार आहे. याबद्दलची माहिची एसबीआयचे अधिकारी अश्विनी कुमार तिवारी यांनी दिली आहे. काय आहे ही योजना? चला जाणून घेऊयात.

या योजनेला सुरु करण्यामागचा उद्देश हा छोट्या व्यावसायिकांना सुलभ आणि सर्वात कमी वेळेत कर्ज उपलब्ध करुन देणे हा आहे. अश्विनी कुमार यांनी सांगितलं की, “जर एखाद्या छोट्या व्यापाऱ्याचे नियमित स्वरुपात UPI व्यवहार सुरु असतील तर त्याचा उपयोग कर्ज देण्यासाठी ग्राह्य धरले जाऊ शकते. विषेश म्हणजे यासाठी GST रेजिस्ट्रेशन नसले तरीही काही फरक पडणार नाही. अशा व्यवसायिकांनाही या कर्ज योजनेसाठी अर्ज करणं शक्य होईल.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बँकेने यापूर्वीच GSTसाठी नोंदणी केलेल्या व्यवसायांना कर्ज देण्याचे आव्हान पार पाडले आहे, आता केवळ दहा मिनिटांमध्ये त्यांना कर्ज देता येते. गेल्या 18 महिन्यांमध्ये बँकेने GST आमि PAN CARD डाटा वापरून 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. दरम्यान, आता ज्यांच्याकडे जीएसटी क्रमांक नाहीत. त्यांना कर्ज देण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांचा यूपीआय डाटा महत्वपूर्ण ठरतो.

यूपीआयच्या कर्ज योजनेवर बोलताना त्यांनी सांगितलं की, “बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा पैसे खरंच कुठे वापरले जाणार आहेत. याची माहिती बँकेलाही नसते. पण कर्जवितरणानंतर जेव्हा पैशांचा वापर सुरु होतो, तेव्हा मात्र त्याचा सर्व तपशिल नक्कीच बँक आणि दूरसंचार कंपन्यांकडे असतो. त्यामुळे याआधारे मिळालेल्या आकड्यांच्या आधारावरुन कर्जाची पात्रता ठरवता येते. त्यामुळे काही मिनिटांमध्ये आता छोट्या व्यवसायिकांना कर्ज वितरणही शक्य आहे.

त्यामुळे आता एसबीआयने ठरवलेले सगळे नियोजन योग्य पार पडले तर छोटे दुकानदार आणि व्यवसाय करणारे व्यापारी या कर्ज योजनेचा फायदा मिळवू शकतील. त्यासाठी जीएसटी क्रमांक असणं बंधनकारक नसेल. त्यामुळे UPI पेमेंटद्वारे केलेले सर्व व्यवहारही आता महत्त्वाचे मानले जाणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us