Gold Price : सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती?
सोन्याच्या किंमतीने गेल्या एक महिन्यातील निच्चांक पातळी गाठली आहे. फेडरल रिझर्व्हच्या संकेतानंतर हे सोन्याचे दर खाली आले आहेत. (Gold Sliver Price Today New Rate)

मुंबई : जागतिक बाजारपेठेत किंमती घसरल्यामुळे गुरुवारी भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Prices Today) कमालीची घट झाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतीत 1.61 टक्क्यांनी, तर चांदीच्या किंमतीत 1.64 टक्क्यांनी घसरली आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीने गेल्या एक महिन्यातील निच्चांक पातळी गाठली आहे. फेडरल रिझर्व्हच्या संकेतानंतर हे सोन्याचे दर खाली आले आहेत. (Gold Sliver Price Today New Rate)
सोन्याचा आजचा भाव काय? (Gold Price)
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती अडीच टक्क्यांनी खाली आल्या आहेत. त्यानुसार सोन्याचा भाव 1.61 टक्के म्हणजे 782 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सध्या बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 724 रुपये झाला आहे.
चांदीचा दर काय? (Silver Price)
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे चांदीचा दर हा 27.09 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. चांदीचा दर हा 1.64 टक्के म्हणजे 1,174 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिला 70,294 रुपये इतका पाहायला मिळत आहे.
सोन्याची किंमत कमी होण्यामागे कारण काय?
यूएस फेडरल रिझर्वने दिलेल्या संकेतानुसार लवकरच अपेक्षेपेक्षा जास्त व्याज दर वाढवू शकतात. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीत अडीच टक्क्यांहून अधिक टक्के घट झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यात डॉलरची किंमत ही उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तर गेल्या दहा वर्षात यूएस ट्रेझरीच्या उत्पादनात वाढ झाली.
सराफा बाजारात सोने-चांदीचे दर काय?
बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदविण्यात आली. तर चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. बुधवारी दिल्लीत सोन्याचे भाव 48 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे एक तोळे सोन्याची किंमत ही 47,814 रुपये इतकी झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत 340 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर हा प्रतिकिलो 70,589 रुपये इतका झाला आहे.
(Gold Sliver Price Today New Rate)
संबंधित बातम्या :
Income Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…