EPF वर होणाऱ्या कमाईवर टॅक्स कॅल्क्युलेशन कसं होणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

| Updated on: Feb 10, 2021 | 10:27 PM

एका आर्थिक वर्षात पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक टॅक्स मर्यादेच्या बाहेर असेल. त्यापुढे जर गुंतवणूक असेल तर त्यावर जेवढं व्याज येईल ते टॅक्सचा मर्यादेत असणार आहे.

EPF वर होणाऱ्या कमाईवर टॅक्स कॅल्क्युलेशन कसं होणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं
करवसुलीसाठी ग्रामपंचायतीची भन्नाट कल्पना
Follow us on

मुंबई : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडवर ट्रॅक्सची घोषणा करण्यात आली आहे. एका आर्थिक वर्षात पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक टॅक्स मर्यादेच्या बाहेर असेल. त्यापुढे जर गुंतवणूक असेल तर त्यावर जेवढं व्याज येईल ते टॅक्सचा मर्यादेत असणार आहे. जर एखाद्याची पगार 21 लाख रुपये आहे तर या नियमानुसार त्याला टॅक्स भरावा लागणार आहे. आतापर्यंत EPF मधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरील इनकम टॅक्स फ्री होतं. पण नव्या नियमानुसार आता टॅक्सचं कॅल्क्युलेशन कसं होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.(How will the tax calculation be done on the earnings on EPF?)

सध्या इंटरेस्ट कॅल्क्यूलेशनबाबत स्पेसिफिक गाईडलाईन्सची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान CBDTचे चेअरमन पी.सी. मोदी यांनी सांगितलं आहे की, EPFच्या इंटरेस्ट इनकमवरही फिक्स डिपॉझिटच्या इंटरेस्ट इन्कमनुसारच टॅक्स लागणार आहे. दरम्या न याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही तज्ज्ञांचं मत आहे की, PF मध्ये जर 2.5 लाख पेक्षा अधिक गुंतवणूक केलं जात असेल तर PF स्टेटमेंटमध्ये वेगळा पॅटर्न असू शकतो.

सध्या टॅक्स रुल्सबाबत अपुरी माहिती

बँक बाजारचे सीईओ आदिल शेट्टी यांचं म्हणणं आहे की, काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. घोषणेनुसार 2.5 लाख पेक्षा अधिक गुंतवणूक केल्यावर जास्तीच्या फंडवर इंटरेस्ट इनकमवर टॅक्स लागेल. अशावेळी जेव्हा एका वर्षाच्या इंटरेस्ट वर टॅक्स कॅल्क्यूलेशन केलं जाईल तर ते येणाऱ्या आर्थिक वर्षात पूर्णपणे टॅक्स फ्री असावं. जर पुढील आर्थिक वर्षात ते 2.5 लाखाच्या लिमीटमझ्ये सामिल होत असेल तर हे टॅक्सवर टॅक्स लागल्याप्रमाणे होईल.

कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल

  • अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
  • उत्पन्न 2.5 ते 5 लाख – 5 टक्के कर (आधीही 5 टक्के)
  • उत्पन्न 5 लाख ते 7.5 लाख – 10 टक्के कर (आधी 20 टक्के)
  • उत्पन्न 7.5 लाख ते 10 लाख – 15 टक्के कर (आधी 20 टक्के)
  • उत्पन्न 10 लाख ते 12.5 लाख – 20 टक्के कर (आधी 30 टक्के)
  • उत्पन्न 12.5 ते 15 लाख – 25 टक्के कर (आधी 30 टक्के)
  • उत्पन्न 15 लाखांपेक्षा अधिक – 30 टक्के कर (कोणतीही सवलत नाही)

संबंधित बातम्या :

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

कन्फ्युजन ही कन्फ्युजन है| नवा की जुना टॅक्स स्लॅब? 5 लाखापर्यंत टॅक्स आहे की नाही?

How will the tax calculation be done on the earnings on EPF?