Union Budget 2021 highlights : नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला अर्थसंकल्प 2021-22 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (FM Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील हा तिसरा अर्थसंकल्प (Union budget of India) आहे. यंदाच्या अर्थसंकल्पावर कोरोना प्रादुर्भाव, मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर असं मोठं संकट होतं. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं. (union budget 2021 live finance minister nirmala sitharaman full paperless speech highlights)