Mahayuti Govt Anniversary : फडणवीसांच्या डोळ्यात पाणी अन् काही क्षण… ‘महायुती’च्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना भावूक
महायुती सरकारने एक वर्ष पूर्ण केले. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथ मुलांशी संवाद साधला, त्यावेळी ते भावूक झाल्याचे दिसले. दरम्यान, मुंबई भाजपने मनपा निवडणुकांसाठी संचालन समिती जाहीर केली असून, विरोधकांनी सरकारवर टीका करत वर्षपूर्तीला नाकर्तेपणाची उपलब्धी म्हटले आहे.
आज महायुती सरकारने सत्तेत येऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. या वर्षपूर्ती निमित्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील अनाथ मुलांसोबत संवाद साधला. या हृदयस्पर्शी भेटीदरम्यान, अनाथ मुलांशी बोलताना मुख्यमंत्री काही क्षण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचा दिवस मुख्यमंत्र्यांनी या मुलांशी संवाद साधून सुरू केला. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय
तर दुसरीकडे मुंबई भाजपने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपली संचालन समिती जाहीर केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली या दीडशे सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, तसेच विनोद तावडे आणि रवींद्र चव्हाण हे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी असतील. आशिष शेलार यांच्यावर या समितीचे निवडणूक प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही समिती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे संपूर्ण कामकाज पाहणार असून, या समितीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल.
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

