सरकारी कामातील भ्रष्टाचार की महागाई सी-व्होटर सर्व्हेत नागरिकांसाठी महत्वाचा मुद्दा कोणता ?
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला एक वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सी-व्होटर घेण्यात आलेल्या सर्व्हेत राज्यातील जनतेसमोर सध्या कोणते महत्वाचे मुद्दे आहेत याची माहिती समोर आली आहे

महाराष्ट्र राज्यातील २५० पेक्षा अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. आता २१ तारखेला या निवडणूकांची मतमोजणी होणार आहे. त्यातच राज्यातील महायुती सरकारला एक वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सी-व्होटर सर्व्हे करण्यात आला आहे.या सर्व्हेत राज्यातील जनतेला एकूण ४५ प्रश्न विचारण्यात आले. त्यातील उत्तरांवरुन राज्याच्या प्रगतीपूस्तक समोर आले आहे. राज्यातील जनतेला तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता असा प्रश्न विचारण्यात आला.त्यावर ३०.२ टक्के लोकांनी बेरोजगारी असे उत्तर दिले आहेत. तर त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्याला ३०.९ टक्के लोकांनी महत्व दिले आहे.
राज्यातील जनतेला तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे. याप्रश्नावर लोकांनी १ ) बेरोजगारी ३०.२ टक्के ,२) वीज-पाणी-रस्ते १०.५ टक्के, ३) शेतकऱ्यांचे मुद्दे ३०.९ टक्के, ४) हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती – १.९ टक्के, ५) कायदा-सुव्यवस्था आणि महिलांची सुरक्षा – ६.८ टक्के, ६) सरकारी कामातील भ्रष्टाचार-स्थानिक भ्रष्टाचार ७.७ टक्के. ७ ) सीएए/एनआरसी/एनसीपीआर/राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे २.२ टक्के, ८ ) महागाई – ४.८ टक्के ९ ) राज्याचा सर्वांगिण विकास – २.८ टक्के, १० ) इतर मुद्दे/माहिती नाहीत/ सांगू शकत नाही – २.४ टक्के महत्व देण्यात आले आहे.
कोणत्या आघाडीने सर्वोत्तम कामगिरी केली ?
तुमच्या मते आतापर्यंत कोणत्या आघाडीने किंवा पक्षाने महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या प्रश्नावर १ ) काँग्रेस – २१.२४ टक्के, २ ) भाजपा – ३५.५ टक्के ३ ) शिवसेना – १२.५ टक्के , ४ ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – ५.१ टक्के ५ ) शिवसेना-भाजपा युती – ६.० टक्के, ६ ) काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी – ३.४ टक्के, ७ ) महाविकास आघाडी – ५.९ टक्के, ८) माहिती नाही/ सांगू शकत नाही १०.१ टक्के अशा मतप्रदर्शन केले आहे.
खासदाराचे प्रगतीपुस्तक ?
तुमच्या लोकसभा मतदार संघातील खासदाराची कामगिरी आणि त्यांना पुन्हा एकदा निवडून आणण्याबद्दल तुमचे मत काय ? १ ) मी खूश आहे आणि तो पु्न्हा जिंकावा असे मला वाटतं – ३९.१ टक्के, २) मी खुश आहे पण मला वाटतं कोणी दुसऱ्याने जिंकावे – २२.१ टक्के, ३ ) मी नाखूश आहे आणि निश्चितपणे वाटते की दुसऱ्याने जिंकावे – २४.२ टक्के, ४ ) मी नाखूश आहे पण तरीही त्याने पुन्हा जिंकावे असे मला वाटतं – ३.४ टक्के, ५ ) मी त्याला ओळखत नाही – ४.३ टक्के, ६) माहित नाही / सांगू शकत नाही – ६.९ टक्के असे खासदाराचे प्रगतीपुस्तक सांगितले आहे.
