Crude Oil Inflation : महागाईच आता स्वस्त आहे! या 23 देशांच्या इशाऱ्यावर नाचते महागाई

| Updated on: Apr 15, 2023 | 10:00 AM

Crude Oil Inflation : रशिया-युक्रेन युद्धामुळे जग आधीच वेठीशी धरल्या गेले आहे. आता ओपेक, रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटविल्याने महागाई प्रत्येक देशात नाचणार आहे...

Crude Oil Inflation : महागाईच आता स्वस्त आहे! या 23 देशांच्या इशाऱ्यावर नाचते महागाई
Follow us on

नवी दिल्ली : ओपेक प्लस (OPEC Plus) देशांनी मे महिन्यापासून कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याची घोषणा केली. त्याच्या अंमलबजावणीचा संभ्रम या देशांनी दूर केला. या घोषणेमुळे कच्चा तेलाचे दर (Crude Oil Price) भडकले. मेनंतर कच्चा तेलाचे भाव पुन्हा शंभरी गाठतील. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या प्रमुखाने या निर्णयामुळे जगात महागाई भडकेल आणि अनेक देशांना संकटांना सामोरे जावे लागेले, हे स्पष्ट केले. भारत 80 टक्क्यांहून अधिक कच्चा तेलाची आयात करतो. त्यामुळे या नवीन संकटाने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पण केंद्र सरकारने रशिया आणि इराणकडून स्वस्तात इंधनाचा राजमार्ग शोधला आहे. त्याचा कितपत फायदा होईल हे समोर येईल.

OPEC Plus चा दादागिरी
जगात ओपेक प्लस देशांची दादागिरी आहे. या देशांनी शीतयुद्धाच्या मागेपुढे अमेरिकेला पण हैराण करुन सोडले होते. या संघटनेत रशियासह एकूण 23 देश आहेत. हे तेल उत्पादक देश, जगातील कच्चा तेलाच्या किंमती नियंत्रीत करतात. त्याचा थेट परिणाम अनेक अर्थव्यवस्थांवर होतो. या संघटनेच्या धोरणानुसार, जगात महागाईचा खेळ खेळण्यात येतो. विकसीत, विकसनशील आणि गरीब देशांना याचा मोठा फटका बसतो. ओपेकची भीती जर्मनी, इंग्लंडपासून अनेक बड्या अर्थव्यवस्थांना सतावत आहे.

तारीख केली निश्चित
ओपेक देशांपूर्वी रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांना कटशाह देण्यासाठी ही चाल खेळण्यात आली होती. रशियाच्या या खेळीत आता ओपेक संघटना पण उतरली आहे. त्यांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याची घोषणा केली. 2 एप्रिल रोजी ही घोषणा करण्यात आली. 1 मेपासून प्रत्येक दिवशी 1.66 दशलक्ष बॅरल तेलाचे उत्पादन घटविण्यात येईल. परिणामी किंमती 6 टक्क्यांनी भडकण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

किती महागणार कच्चे तेल
तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या मते, कच्चा तेलाचे भाव 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहचतील. चीनने गेल्या तीन वर्षानंतर कच्चा तेलाची मोठी मागणी नोंदवली आहे. झिरो कोविड पॉलिसी शिथिल केल्यानंतर चीनकडून अधिक मागणी नोंदवण्याची शक्यता आहे. तर कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यास मागणीत घट होण्याची शक्यता आहे.

महागाई गगनाला भिडणार
ओपेक प्लसच्या निर्णयाचा सर्वच अर्थव्यवस्थांना धक्का बसणार आहे. अमेरिका, युरोप आणि आशियातील अर्थव्यवस्थांना आणखी संकटांचा सामना करावा लागू शकतो. सध्या पाकिस्तान, श्रीलंकेची अवस्था आपल्या डोळ्यासमोर आहे. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धापासून जगात महागाई भडकली आहे. रशियाने कच्चे तेल बाजारात न दाखल केल्याने किंमती 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या होत्या. अमेरिका सध्या 40 वर्षानंतरची महागाई अनुभवत आहे.