AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : राज्यात रायगडमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल! तुमच्या शहरातील भाव काय

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाने आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा उसळी घेतली. तेल कंपन्यांनी आजचे भाव सकाळीच जाहीर केले. तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल आज झाले का स्वस्त

Petrol Diesel Price Today : राज्यात रायगडमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल! तुमच्या शहरातील भाव काय
| Updated on: Apr 15, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली : आज राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल कोकणातील रायगडमध्ये मिळत आहे. राज्यातील इतर शहरात भावात चढउतार आहे. पण राज्यातील काही शहरात पेट्रोल-डिझेलची (Petrol-Diesel Price) महागाई कमी होताना दिसत नाही. या शहरवासियांना कायम दरवाढीचा सामना करावा लागत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या (Crude Oil) किंमतीत वाढ झाली. उत्पादन घटविल्याने हे संकट ओढावले आहे. भारतावर त्याचा काय परिणाम होईल हे मे आणि जून महिन्यात दिसेल. कालपेक्षा एक डॉलरच्या आसपास ही दरवाढ झाली. तेल कंपन्यांनी आजचे भाव सकाळीच जाहीर केले. तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल आज झाले का स्वस्त?

महागाईची झळ नाही रशिया पाठोपाठ आता इराण भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅरलमागे दोन रुपयांची बजत होत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.

कच्चा तेलाची दरवाढ 15 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 82.52 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 86.31 डॉलर प्रति बॅरलवर आहे. दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत.

रायगडमध्ये स्वस्त इंधन भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करतात. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. रायगडमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 105.89 तर डिझेलची किंमत 92.39 रुपये आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.21 तर डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.34 पेट्रोल आणि डिझेल 93.82 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 108.04 तर डिझेल 94.51 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर

उत्पादन घटवले

  1. ओपेक आणि रशियाचा कच्चा तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय
  2. 1 दशलक्ष कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्यात येईल
  3. सौदी अरब प्रति दिवस 5 लाख बॅरल कपात करणार
  4. इराक प्रति दिवस 211,000 बॅरल कच्चा तेलाचे उत्पादन घटविणार
  5. संयुक्त अरब अमिरात 144,000 बॅरल प्रति दिवस कपात करणार
  6. कुवेत 128,000 बॅरल तर अल्गेरिया 48 हजार बॅरलचे उत्पादन घटविणार
  7. ओमानने 40,000 हजार बॅरल प्रति दिवस कपातीचा निर्णय घेतला आहे.
  8. त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 6 टक्के वाढ झाली

Follow Us
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल