Petrol-Diesel Price: अब की बार महंगाई की मार… पुन्हा पेट्रोल-डिझेल महागणार? 90 पैशांचा फॉर्म्युला तुमचं कंबरडं मोडणार?
Petrol Diesel Price Hike: आता सर्वच बाजूने महागाईने आक्रमण केले आहे. मध्यमवर्गाला महागाईचे चटके बसत आहे. तर गरीब होरपळले आहेत. 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महागले होते. तर आज पुन्हा जवळपास एक रुपयांनी किंमत वधारली. आता 90 पैशांचा फॉर्म्युल्याची अंमलबजावणी होणार का?

Petrol Diesel Price Hike: देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. पाच दिवसांपूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी जनतेला महागाईचा झटका दिला होता. आत पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. 90 पैशांनी किंमती वाढवण्यात आल्या आहेत. किंमतींचा हा पॅटर्न पाहता 2022 मधील इंधन दरवाढीचा 90 पैसे दरवाढीचा फॉर्म्युला पुन्हा अंमलात येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यावेळी जवळपास 15 दिवस रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत थोडी थोडी वाढ करण्यात आली होती.
4 वर्षांनी दरवाढ, आता थोडी थोडी भाववाढ
वर्ष 2022 नंतर जवळपास चार वर्षांनी देशात इंधन दरवाढ करण्यात आली आहे. मध्य-पूर्वेतील संकट आणि होर्मुज समुद्रधुनी बंद झाल्याने तेल संकट गडद झाले आहेत. पाच दिवसांपूर्वी सर्व तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली होती. तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा होत असल्याने दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत किंमती वाढवण्यात आल्या आहेत. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी प्रति लिटर महागले आहेत.
2022 मधील 90 पैशांचा फॉर्म्युला पुन्हा अंमलात?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2022 मध्ये कमी अधिक जवळपास 15 दिवस वाढवल्या गेल्या. त्यावेळी रशिया-युक्रेन या दोन देशातील युद्धामुळे कच्चे तेलाच्या किंमती भडकल्या होत्या. तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. त्यावेळी मार्च ते एप्रिल 2022 दरम्यान केवळ 15 दिवसात तेल कंपन्यांनी थोडी थोडी करत मोठी वाढ केली होती. त्यावेळी 13 वेळा पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करण्यात आली होती. 10 दिवस रोज 80 पैसे प्रति लिटर दरवाढ करण्यात आली होती. IOCL, BPCL, HPCL सारख्या कंपन्या आता हाच फॉर्म्युला येत्या काही दिवस राबवणार का? असा सवाल केल्या जात आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये किंमत किती?
अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचे अशा पंचवटी चौकातील पेट्रोल पंपवर पेट्रोलचा खळखळाट दिसला. काल दुपारीच पंचवटी चौकातील पेट्रोल पंपवरील पेट्रोल संपले. अजूनही पेट्रोलचा टँकर पोहोचला नाही. युद्धाचे परिणाम आता अमरावती शहरातील पेट्रोल पंप च्या पेट्रोल पुरवठ्यावर होत आहे. अत्यंत महत्त्वाच्या चौकातील पेट्रोल पंप वर पेट्रोल नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
नागपूरमध्ये काय भाव?
गेल्या 5 दिवसात दुसऱ्यांना पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. नागपूर मध्ये पेट्रोल च्या किमतीत 91 पैस्याची वाढ तर डिझेलच्या किमतीत सुमारे 93 पैश्यांची वाढ झाली आहे. नागपूर मध्ये आजचे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 108,07 पैसे तर काल चे दर 107,16 पैसे होते. काल नागपूर मध्ये डिझेल चे दर 93.70 पैसे तर आज 94.63 पैसे होते.
छत्रपती संभाजीनगर पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
पेट्रोल दर
दर वाढण्याच्या अगोदर: 108.56 पैसे
दर वाढल्याच्या नंतर: 109.47
वाढलेले पेट्रोल दर : 0.91 पैसे
डिझेल दर
पहिले दर: 95.01
आताचे: 95.95
वाढलेले दर: 0.94 पैसे
पुण्यात पेट्रोल – डिझेलमध्ये 90 पैशांनी वाढ
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचत करण्याचं आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेल मध्ये दरवाढ होताना दिसत आहे.दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल डिझेलमध्ये तीन रुपयांनी वाढ झाल्यानंतर आज 90 पैशांनी पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झाली आहे. डिझेल 94.40 प्रति लिटर तर पेट्रोल 107.86 रुपये असा आता शहरातील भाव आहे.