SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका

SBI : तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. बँकेची एक महत्त्वाची सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
sbi
Image Credit source: Google
| Updated on: Apr 10, 2026 | 10:40 PM

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठा बँक आहे. तुमचे या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. एसबीआयच्या ग्राहकांना उद्या (11 एप्रिल) काही काळासाठी व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. याबाबत स्वतः SBI ने आपल्या ग्राहकांना अलर्ट केले आहे. नियोजित मेंटेनन्समुळे OTP-आधारित सेवांमध्ये काही वेळ अडथळे येण्याची शक्यता आहे अशी माहिती बँकेने दिली आहे. त्यामुळे तुम्ही इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे पेमेंट करत असाल, तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे 52 कोटींपेक्षा जास्त खातेदार आहेत. बँकेने दिलेल्या माहितीनुसार 11 एप्रिल 2026 रोजी पहाटे 02:30 ते 02:50 (IST) या वेळेत OTP-आधारित इंटरनेट बँकिंग सेवा, YONO Lite आणि YONO ॲपमध्ये अधूनमधून अडथळे येऊ शकतात. त्यामुळे या काळात ग्राहकांनी ATM, UPI, Secure OTP आणि SBI ऑथेंटिकेटरचा वापर करून व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SBI सेक्युअर OTP म्हणजे काय?

SBI सेक्युअर OTP हे एक OTP तयार करणारे ॲप आहे, ज्याचा वापर SBI इंटरनेट बँकिंग आणि YONO Lite SBI ॲपद्वारे केलेल्या व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी केला जातो.

SBI ऑथेंटिकेटर म्हणजे काय?

SBI ऑथेंटिकेटर हे SBI ने विकसित केलेले अतिरिक्त सुरक्षा ऑथेंटिकेशनचे साधन आहे. यामध्ये वापरकर्त्यांना विविध पर्याय उपलब्ध असतात. यात प्रॉम्प्ट, QR कोड किंवा ॲप-आधारित OTP चा समावेश आहे. हे SMS OTP चा सुरक्षित आणि आधुनिक पर्याय आहे.

सेक्युअर OTP कसा तयार करायचा?

SBI वापरकर्ते इंटरनेट बँकिंग किंवा YONO Lite ॲपद्वारे व्यवहार करताना दोन प्रकारे OTP तयार करू शकतात. ऑनलाइन OTP साठी इंटरनेट कनेक्शन (SIM किंवा Wi-Fi) आवश्यक असते.

SBI सेक्युअर OTP अॅपसाठी नोंदणी कशी करावी?

  • स्टेप 1 : SBI सेक्युअर OTP ॲप डाउनलोड करून उघडा आणि आपले युजरनेम टाका. मोबाईल नंबर पडताळण्यासाठी SMS पाठवण्याचा संदेश दिसेल.
  • स्टेप 2: ‘Proceed’ बटणावर क्लिक करा. एक युनिक कोड असलेला SMS पूर्वनिर्धारित नंबरवर पाठवला जाईल. (SMS साठी तुमच्या प्लॅननुसार शुल्क लागू होऊ शकते.)
  • स्टेप 3: पासवर्ड टाका आणि ‘Proceed’ वर क्लिक करा. नियम व अटी मान्य करून ‘Ok’ करा.
  • स्टेप 4: नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
  • स्टेप 5: OTP टाका. OTP पडताळणी झाल्यानंतर, ॲपसाठी MPIN सेट करण्यास सांगितले जाईल.

यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ॲक्टिव्हेशन कोड पाठवला जाईल. हा कोड 10 मिनिटांसाठी वैध असेल. त्यानंतर OnlineSBI मध्ये लॉग इन करून ॲपक्टिव्हेशन पूर्ण करावे लागेल.

Follow Us