AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात

जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर पोस्ट ऑफीसच्या या योजना चांगला पर्याय आहे. यात योजनेत सरकारी गॅरंटीसोबत पैसा सुरक्षित रहातो आणि काळासोबत पैसा वाढतो. किसान विकास पत्र योजनेत पैसा दुप्पट होतो. तर नॅशनल सेव्हींग्स सर्टीफिकीट्समध्ये चांगले व्याज आणि टॅक्स बचत मिळते. दोन्ही योजनेत जोखीम कमी आणि परतावा स्थिर मिळतो.

पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात
Post Office Schemes
| Updated on: Apr 09, 2026 | 6:44 PM
Share

जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहात आणि पैसा कोणत्याही रिस्क विना वेगाने वाढवू इच्छीत असाल तर पोस्ट ऑफीसच्या काही योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतात. खास बाब म्हणजे यातील गुंतवलेल्या पैशाला सरकारी गॅरंटी असते आणि योग्य काळानंतर निश्चित रिटर्न मिळतो. यातील एक योजना अशी आहे ज्यात निश्चित काळात तुमचा पैसा डबल होतात. तर दुसरी स्कीम टॅक्स बचतीसह चांगले व्याज देते. चला तर दोन्ही योजनांची माहिती घेऊयात..

किसान विकास पत्र ( KVP )

किसान विकास पत्र ( KVP ) पोस्ट ऑफिसची सर्वात प्रसिद्ध योजनेपैकी एक आहे. या योजनेचा हेतू लोकांना दीर्घ काळासाठी सेव्हींगसाठी प्रेरित करणे आहे.

काय आहे या योजनेची खासियत ?

या योजनेत तुमची गुंतवणूक ९ वर्षे ५ महिन्यात डबल होते. या योजनेत व्याजदर ७.५ वार्षिक हिशेबाने वाढत जातो.

किसान विकास पत्र (KVP) कसे काम करते ?

समजा तुम्ही एक लाख रुपये किसान विकास पत्र मध्ये गुंतवले. या योजनेत वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळते. खास बाब म्हणजे हे व्याज चक्रवाढ ( व्याजावर व्याज ) पद्धतीने वाढते.म्हणजे दर वर्षी जे व्याज मिळते, ते स्वतंत्र मिळत नाही, त्याऐवजी मूळ रकमेला जोडले जाते. नंतर पुढच्या वर्षी त्या वाढलेल्या एकूण रकमेवर पुन्हा व्याज मिळते.

किसान विकास पत्राची वैशिष्ट्ये ?

किमान गुंतवणूक – १००० रुपये

कमाल गुंतवणूक – कोणतीही मर्यादा नाही.

कोण गुंतवणूक करु शकतो – कोणताही भारतीय नागरिक

कागदपत्रांची आवश्यकता – PAN ( ५० हजाराच्या वरील रक्कम ), १० लाखावरील रक्कम ( इन्कम प्रुफ ) सुरक्षा: भारत सरकारची गॅरंटी. ही स्कीम त्या लोकांसाठी आहे जे विना जोखीम पैसे डबल करण्याऐवजी फिक्स रिटर्न आणि टॅक्स वाचवू इच्छीतात.

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकीट्स (NSC) –

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकीट्स (NSC) देखील पोस्ट ऑफिसची एक सुरक्षित स्कीम आहे. परंतू यातही पैसे डबल होण्याच्या ऐवजी फिक्स रिटर्न आणि टॅक्स बचत मिळते.

NSC च्या गरजेच्या बाबी –

व्याज दर: ७.७ टक्के वार्षिक

लॉक-इन पीरियड: ५ वर्षांचा आहे, मात्र, ९ वर्षे ते ३ महिन्यात पैसे डबल होऊ शकतात.

किमान गुंतवणूक : १,००० रुपये

कमाल मर्यादा – कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जेवढे हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. मात्र, आयकर अधिनियम कलम ८० सी अंतर्गत टॅक्स सुट केवळ १.५ लाख प्रति वर्षापर्यंतच्या गुंतवणूकीवरच मिळते. जर तुम्ही National Savings Certificate ( NSC ) मध्ये ५ लाख गुंतवणूक करत आहात आणि हे पैसे डबल केव्हा होणार याची माहिती कळण्यासाठी आपण कम्पाऊंड व्याजाचा फॉर्म्युला वापरावा लागेल.

M = P (1 + r/100)^n.

या फॉर्म्युल्यात P तुमची गुंतवणूक असते. r व्याजदर असतो आणि n वर्षांची संख्या असते. येथे p = ५,००,०००, r = ७.६ टक्के आणि आम्ही n काढायचा असेल म्हणजे पैसे १०,००,००० रुपये बनतील. वास्तविक NSC चा अवधी केवळ पाच वर्षांचा असतो. यामुळे तुमची पहिली गुंतवणूक पाच वर्षांनंतर मॅच्युअर होईल, तेव्हा तुम्हाला त्या रकमेस पुन्हा त्याच योजनेत गुंतवावे लागेल.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?