SpaceX मुळे एलॉन मस्क याने रचला इतिहास! पैसा मोजताना सर्वच मशीन थकल्या… संपत्तीत 21 देशांना टाकले मागे… दूर दूरवर नाही कोणी

World First Trillionaire: एलॉन मस्क याने पुन्हा एकदा मोठा विक्रम केला आहे. त्याच्या स्पेसएक्स आयपीओमुळे पैशांचा पाऊस पडला आहे. तो जगातील सर्वात पहिला खरबपती, ट्रिलिनिअर ठरला आहे.

SpaceX मुळे एलॉन मस्क याने रचला इतिहास! पैसा मोजताना सर्वच मशीन थकल्या... संपत्तीत 21 देशांना टाकले मागे... दूर दूरवर नाही कोणी
एलॉन मस्क, खरबपती
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 12, 2026 | 2:06 PM

World First Trillionaire: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याने पुन्हा इतिहास घडवला. ज्या विक्रमाला अद्याप कोणीच गवसणी घातली नाही, तो मस्क याने पूर्ण केला आहे. SpaceX च्या रेकॉर्डतोड आयपीओमुळे मस्क याची एकूण संपत्ती 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे एक लाख कोटी डॉलरच्या घरात पोहचली आहे. एलॉन मस्क हा जगातील पहिला ट्रिलिनिअर, खरबपती ठरला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पेसएक्सने आयपीओच्या माध्यमातून 75 अब्ज डॉलरची संपत्ती मिळवली. ऐतिहासिक लिस्टिंगनंतर स्पेसएक्सचे मूल्य वेगाने वाढले. मस्क याची एकूण संपत्ती 1.1 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक झाली. आयपीओपूर्वी फोर्ब्सने त्याची संपत्ती जवळपास 780 अब्ज डॉलर इतकी असल्याचे म्हटले होते.

21 देशांच्या GDP पेक्षा अधिक संपत्ती

एलॉन मस्क याची संपत्ती इतकी मोठी आहे की तिची सहज अंदाज लावण्यासाठी एक उदाहरण देण्यात येत आहे. जगातील काही देशांच्या अर्थव्यवस्थेशी एलॉन मस्क याच्या संपत्तीची तुलना करण्यात आल्यावर आश्चर्य चकीत करणारी माहिती समोर आली आहे. सध्या जगातील केवळ 21 देशांची GDP हा 1 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. म्हणजे 21 देशानंतर एलॉन मस्क याची खासगी संपत्ती ही 22 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरते. त्याने या 21 देशांना सुद्धा मागे टाकल्याचे म्हटले जाते.

स्पेसएक्समुळे पैशांचा पाऊस

मस्क याच्या संपत्तीचा एक मोठा भाग हा स्पेसएक्समधून येतो. वृत्तानुसार, कंपनीत त्याचा वाटा जवळपास 866 अब्ज डॉलर इतका आहे. याशिवाय इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स, पूर्वीचे ट्विटर, न्यूरालिंक आणि द बोरिंग कंपनीतून ही त्याला मोठे उत्पन्न मिळते.

टेस्लापासून सुरू झाला प्रवास

54 वर्षांचा एलॉन मस्क याचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता. टेस्ला आणि स्पेसएक्सच्या माध्यमातून त्याने स्वतःची वेगळी छाप सोडली. टेस्लाने इलेक्ट्रिक वाहनाच्या दुनियेत मोठी क्रांती घडवली. तर स्पेसएक्सने खासगी अवकाश क्षेत्राला नवीन दिशा दिली.

पहिल्यांदाच इतिहास घडला

जगाने आतापर्यंत अनेक अब्जाधीश पाहिले आहे. पण खरबपतीचा, ट्रिलिनिअरचा मान पहिल्यांदाच एलॉन मस्क याला मिळाला आहे. त्याची एकूण संपत्ती ही जगातील आर्थिक इतिहासातील एक सुवर्णपान आहे. हा विक्रम मोडणे जवळपास अशक्यप्राय मानले जात आहे.

Follow Us