Yes Bank च्या ॲपद्वारे करा डिजिटल रुपीचा वापर, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

| Updated on: Dec 02, 2022 | 7:41 PM

येस बँकेचे ॲप वापरून डिजिटल रूपाचा वापर कसा करता येईल याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

Yes Bank च्या ॲपद्वारे करा डिजिटल रुपीचा वापर, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
येस बँक
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीस रिझर्व्ह बँकेने डिजिटल रुपयाच्या (Digital Rupee) किरकोळ वापरासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. यासह, देशात सामान्य लोकांकडून डिजिटल पैशाचा वापर औपचारिकपणे सुरू झाला आहे. डिजिटल पैशाबद्दल लोकांमध्ये उत्साह आहे आणि सोशल मीडियावर लोक सतत विचारत आहेत की ते डिजिटल पैशाचा वापर कसा करू शकतात. पायलट प्रोजेक्टमध्ये सामील असलेल्या येस बँकेने (Yes Bank) लोकांना माहिती दिली आहे की, ते या नवीन बदलाचा भाग कसे बनू शकतात.

कसा घ्याल येस बँकेच्या सुविधेचा लाभ?

येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही सुविधा निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध असेल आणि ग्रुपमध्ये येणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून एका लिंकद्वारे डिजिटल वॉलेट पाठवले जाईल, जे ते त्यांच्या फोनवर इन्स्टॉल करू शकतात. बँकेनुसार, तुम्ही तुमच्या बँक खात्यातून या वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. ज्याच्या मदतीने तुम्ही रोख वापरता त्याप्रमाणे तुम्ही कोणालाही पैसे देऊ शकता. वास्तविक डिजिटल रुपया हा रोख रकमेसारखाच असतो पण तो डिजिटल स्वरूपात असतो. तुम्ही वॉलेटमधून सहज पैसे काढू शकता आणि ते तुमच्या बँक खात्यात परत ठेवू शकता.

बँकेने म्हटले आहे की ग्राहक इतर कोणत्याही ग्राहकाला किंवा ग्रुपमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही व्यापाऱ्याला पैसे देऊ शकतो. दुकानात पैसे भरण्यासाठी ग्राहक क्यूआर कोडची मदत घेऊ शकतात. सध्या ही सुविधा फक्त ग्रुपमध्ये सामील होणाऱ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांनाच मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

कुठे सुरू झाला आहे हा पायलट प्रोजेक्ट

रिझव्‍‌र्ह बँकेने मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर येथे डिजिटल रुपयाचा परिचय करून देण्यासाठी पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. पथदर्शी प्रकल्पासाठी चार बँकांची निवड करण्यात आली आहे, ज्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक यांचा समावेश आहे. ही शहरे आणि या बँकांचा समावेश असलेल्या मर्यादित वापरकर्ता गटामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या गटामध्ये विशिष्ट ग्राहक आणि व्यापारी समाविष्ट आहेत. ग्रुपमध्ये समाविष्ट असलेले व्यापारी आणि वापरकर्ते बँकांच्या मदतीने डिजिटल चलनात व्यवहार करू शकतील. दुसऱ्या टप्प्यात आणखी नऊ शहरे आणि इतर चार बँकांचा समावेश करण्यात येणार आहे.

कसा केला जाईल व्यवहार

बँकांमार्फत ग्राहकांना डिजिटल रुपी वितरित केले जातील आणि वापरकर्ते प्रायोगिक चाचणीत सहभागी होणाऱ्या बँकांनी ऑफर केलेल्या डिजिटल वॉलेटद्वारे ई-रुपीमध्ये व्यवहार करू शकतील. हे व्यवहार P2P म्हणजे लोकांमध्ये आणि P2M म्हणजेच व्यक्ती आणि व्यापारी यांच्यात करता येतात.