
कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही विविध प्रकारच्या आकारण्यात येत असलेल्या करांवर अवलंबून असते. या कर प्रक्रियेचा महत्वपूर्ण भाग आयकर असतो. काही देशांमध्ये आयकर मोठ्या प्रमाणावर वसूल केला जातो. परंतु जगात काही देश असे आहेत, ज्या ठिकाणी नागरिकांना आयकर लागत नाही. या देशांमधील करमुक्तीचे धोरण गुंतवणूकदार आणि जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना आकर्षित करत असते. जगभरात असे कोणकोणते देश आहे, ज्या ठिकाणी आयकर लागत नाही, मग त्या ठिकाणी सरकारला कशा पद्धतीने पैसा मिळतो, जाणून घेऊ या.
आतापर्यंत करमुक्त असलेल्या ओमानने सन २०२८ नंतर देशात आकारण्याची घोषणा केली आहे. ओमान अजूनही त्या मोजक्या देशांमध्ये ज्या ठिकाणी नागरिकांना कर द्यावा लागत नाही. परंतु २०२८ नंतर ओमान सरकार नागरिकांकडून उत्पन्नावर कर घेणार आहे. ओमानने यापूर्वीच पाच टक्के वॅट लावला आहे. तसेच कंपन्यांकडून कॉरपोरेट टॅक्सही घेतला जात आहे. येत्या काळात त्या ठिकाणी काम करणारे नागरिक किंवा विदेशातून आलेल्या कर्मचाऱ्यांकडून कर आकारला जाऊ शकतो. ओमानने हे पाऊल कच्चा तेलावर देशाची असलेल्या अर्थव्यवस्थेला पर्याय देण्यासाठी उचलले आहे.
ओमानची अर्थव्यवस्था कच्चा तेलाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. तेलावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्थेला ठोस मॉडल देण्यासाठी आयकर आकारण्याचा निर्णय ओमानने घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सन २०२८ पासून वर्षाला ४२ हजार ओमानी रियाल (जवळपास 93.5 लाख रुपये) उत्पन्न असणाऱ्यांना पाच टक्के कर द्यावा लागणार आहे.
जगात अनेक देशांमध्ये उत्पन्नावर आयकर द्यावे लागते. परंतु काही देश असे आहेत, ज्या ठिकाणी कर लागत नाही. तेल आणि पर्यटन त्या देशांचे उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे. या देशांमध्ये संयुक्त अरब अमीरात, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, ब्रुनेई, बाहामास, मोनाको, कयमैन आयलँड्स, ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स, एंगुइला आणि ओमान यांचा समावेश आहे. या ठिकाणी लोक पगार किंवा व्यापारी उत्पन्नावर कोणताही कर देत नाही. यामुळे श्रीमंत लोक, उद्योगपती आणि विदेशातील व्यक्ती या देशांमध्ये राहण्यास प्राधान्य देतात.