पोलिस विभागात बंपर भरती सुरू, तब्बल इतक्या पदांसाठी भरती, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

| Updated on: Mar 24, 2024 | 3:58 PM

Thane Police Bharti 2024 : अनेकांचे पोलिस होण्याचे स्वप्न असते. आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. नुकताच पोलिस भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

पोलिस विभागात बंपर भरती सुरू, तब्बल इतक्या पदांसाठी भरती, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज
Police
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जाहिर करण्यात आलीये. बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. चला तर झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. जाणून घ्या या भरती प्रक्रियेची प्रक्रिया आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

ही भरती प्रक्रिया ठाणे पोलीस विभागाच्या अंतर्गत रिक्त पदांसाठी राबवली जात आहे. थेट पोलिस विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 686 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी http://www.Thanepolice.gov.in या लिंकवर जाऊन अर्ज करा. याच लिंकवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 31 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी आहे.

पोलीस शिपाई आणि पोलिस शिपाई चालक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असायला हवा. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 18 ते 28 वर्षांपर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये तीन वर्षांची सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि निवड यादी जाहिर केली जाईल. policerecruitment2024.mahait.org वर जाऊन या भरतीचा अर्ज भरा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे.