रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलण्यावरून वाद, चिडलेल्या पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट

| Updated on: Nov 17, 2022 | 10:06 AM

पती पत्नीमध्ये फोनवर बोलण्यावरून झालेले भांडण इतक्या विकोपाला गेले की, चिडलेल्या पत्नीने थेट पतीचा प्रायव्हेट पार्टच कापला.

रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलण्यावरून वाद, चिडलेल्या पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट
बायकोने कापला नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट
Image Credit source: Social Media
Follow us on

बाडमेर,  राजस्थानमधील बाडमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे पती-पत्नीमधील वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या पत्नीने थेट पतीचा प्रायव्हेट पार्टच कापला (Wife cuts her Husband’s private part).  ही घटना बारमेर जिल्ह्यातील धोरिमान्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालीसर गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भालीसर येथील तरुणाचा अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तेव्हापासून पती-पत्नीमध्ये मतभेद आहेत. पीडितेच्या पतीने पोलिसांत दिलेल्या  महिनीनुसार काही दिवसांपूर्वी पती रात्री झोपला होता, मात्र त्याची पत्नी रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत होती.

झोपेत कापले प्रायव्हेट पार्ट

लग्न झाले तेव्हापासूनच दोघांमध्ये वेगवेळ्या कारणांवरून सतत भांडण व्हायची. घरच्यांनी दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलण्याच्या पत्नीच्या सवयीला पतीचा विरोध होता. या आधी देखील फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं झाले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर तो झोपी गेला आणि त्यानंतर पती झोटेत असताना पत्नीने ब्लेडने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. यावर त्यांनी जोरात आरडाओरडा केल्यावर कुटुंबातील इतर सदस्य उठले आणि त्याला लगेच उपचारासाठी रुग्णालयात नेले.

याप्रकरणी बाडमेरचे एएसपी रपतसिंग जैतावत यांनी सांगितले की, लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत भांडण होत असायचे.

हे सुद्धा वाचा

प्रथम पत्नीने पतीविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, पत्नीने प्रायव्हेट पार्ट कापल्याचा आरोप करत पतीने तक्रार दाखल केली आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिस नियमानुसार कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.