के.पी. गोसावीच्या अडचणीत आणखी वाढ, फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल

| Updated on: Oct 30, 2021 | 12:47 PM

K P Gosavi | शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी चिन्मय देशमुख गोसावीच्या विरोधात फरासखाना पोलीस स्टेशनला वेगळी तक्रार देणार आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात पुढे काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

के.पी. गोसावीच्या अडचणीत आणखी वाढ, फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीला अटक
Follow us on

पुणे: क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वानवडी पोलीस स्टेशनमध्येही आज दिवसभरात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी ‘टीव्ही 9’ ला दिली. तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी चिन्मय देशमुख गोसावीच्या विरोधात फरासखाना पोलीस स्टेशनला वेगळी तक्रार देणार आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात पुढे काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक

किरण गोसावीने परदेशात नोकरी लावण्याच्या बहण्याने फसवणूक केल्याप्रकरणी या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या चार जणांचे अर्ज आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे.

मलेशियात नोकरीचं आमिष

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.

कोण आहे किरण गोसावी?

किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता.

संबंधित बातम्या:

Crime: मराठवाड्याला हादरवणाऱ्या तोंडोळी बलात्कारातील सातही आरोपींच्या मुसक्या आवळल्या, 10 दिवसात तपास पूर्ण, अन्य 13 गुन्हे उघड

लेकाच्या स्वागतासाठी मन्नतवर रोषणाई, पण एक चूक नडली, आर्यनची आजची रात्रही तुरुंगातच

Aryan Khan Bail | आर्यन खानचा जामीन आदेश जारी, तुरुंगाबाहेर येण्यासाठी मान्य कराव्या लागल्या ‘या’ अटी!