Crime : NEETचा अभ्यास करताना बाळ रडण्याचा आवाज, विद्यार्थ्याने संतापून केली वहिनीची हत्या

| Updated on: Apr 20, 2022 | 1:09 PM

मध्य प्रदेशातील भोपाळमधून एक धक्कादयाक प्रकार समोर आलाय. ही धक्कादायक घटना ऐकुण तुम्हाला काटा येईव, इतका हा वाईट प्रकार आहे. एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या वहिनीचा कथितरित्या भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime : NEETचा अभ्यास करताना बाळ रडण्याचा आवाज, विद्यार्थ्याने संतापून केली वहिनीची हत्या
Image Credit source: tv9
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशातील (MP) भोपाळमधून (Bhopal) एक धक्कादयाक प्रकार समोर आलाय. ही धक्कादायक घटना ऐकुण तुम्हाला काटा येईव, इतका हा वाईट प्रकार आहे. एका 22 वर्षीय (Youth) तरुणाने आपल्या वहिनीचा कथितरित्या भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पुतण्याच्या सततच्या रडण्याने राग येत होतो. कारण, हा पुतण्या वैद्यकीय प्रवेशाची पर्व तयारी करत होता. मात्र, बाळाच्या रडण्यावरुन  तरुण आणि त्याच्या वहिनीमध्ये वारंवार वाद होत असे. एक दिवस असाच वाद झाला. विद्यार्थी NEETचा अभ्यास करत होता. यावेळी बाळ रडण्याचा आवाज येत असल्याने त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. बाळाच्या रडण्यावरुन या तरुणानं वहिनीला जाब विचारला. यानंतर हा वाद वाढतच गेला. हा वाद इतका टोकाला गेला की या तरुणाने थेट त्याच्या वहिनीचा भोसकून खून केला. ही घटना भोपाळस मध्य प्रदेशात वाऱ्यासारखी पसरली.

नेमकं काय प्रकरण?

गांधी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अरुण कुमार शर्मा यांनी सांगितल्यानुसार, कविता आहिरराव यांचा दीर मनोज अहिरराव याने सोमवारी त्यांच्या घरात कविता यांच्यावर वार करुन तिची हत्या केली. मनोज हा नॅशन एलजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टची तयारी करत होता. त्याचा दोन वर्षांचा पुतण्या रडत होता. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने मृत कविताला बाळ रडणार नाही, याची काळजी घे, असं सांगितलं होतं. पण तिने त्याच्याशी रागाने बोलत दरडावले. याचा या तरुणाला भयंकर राग आला. वहिनीने दरडावल्ल्याने संतप्त झालेल्या दीराने स्वयंपाकघरातून चाकू काढला आणि तिच्यावर निर्दयीपणे वार करून तिची जागीच हत्या केली. आरोपी आणि पीडितेचा या प्रकरणावर यापूर्वी देखील वाद झाला होता. त्यावेळी देखील घरातील इतर सदस्य त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते. दरम्यान, आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

इतर बातम्या

Nashik Water Storage: नाशिकमध्ये झळा तीव्र; जिल्ह्यात फक्त 76 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

Skin | घामामुळे त्वचेची चमक नाहीशी झाली आहे? मग हे खास फेसपॅक त्वचेला लावा आणि रिझल्ट पाहा!

Belgaon Rain : बेळगावात अवकाळी पावसाचा तडाखा, अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू