Belgaon Rain : बेळगावात अवकाळी पावसाचा तडाखा, अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू

बेळगावात परिसरात मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच क्लब रोड येथे दुचाकीवरून जाणाऱ्या विजय यल्लाप्पा कोल्हापूरे वय ६३ यांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे कोल्हापूरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

शुभम कुलकर्णी

|

Apr 20, 2022 | 12:12 PM

बेळगाव : शहर (City) परिसरात मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे (Rain) प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच क्लब रोड येथे दुचाकीवरून जाणाऱ्या विजय यल्लाप्पा कोल्हापूरे वय 63 यांच्या अंगावर झाड (tree) कोसळल्यामुळे कोल्हापूरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बापट गल्ली येथे दुचाकीवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वीज तारांवर फांद्या कोसळल्यामुळे शहराच्या निम्म्याहून अधिक भागातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे शहराच्या सर्वच भागात लहान मोठ्या फांद्या पडल्याचे दिसून येत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें