प्रेमानंद महाराजांचे नाव घेत टाकलं जाळं, महिलेवर पाशवी बलात्कार; भेट घडवण्याच्या नावाखाली हॉटेलमध्ये भयंकर कांड!

Crime News: वृंदावनमधील राधा निवास येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आग्रा येथील एका महिलेला आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराजांशी वैयक्तिक भेट घालून देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यानंतर पीडित महिलेने पोलीसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्रेमानंद महाराजांचे नाव घेत टाकलं जाळं, महिलेवर पाशवी बलात्कार; भेट घडवण्याच्या नावाखाली हॉटेलमध्ये भयंकर कांड!
Rape Crime
| Updated on: Oct 12, 2025 | 9:10 PM

उत्तर प्रदेशातील मथुरा हे एक धार्मिक ठिकाण आहे. मात्र या पवित्र ठिकाणी श्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वृंदावनमधील राधा निवास येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आग्रा येथील एका महिलेला आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराजांशी वैयक्तिक भेट घालून देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यानंतर पीडित महिलेने पोलीसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आता आरोपी सुंदरम राजपूतला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर मैत्री

या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी संजय पांडे यांनी म्हटले की, ‘ही घटना 12 सप्टेंबर रोजी घडली. पीडित महिला ही अध्यात्माशी जोडलेली असून ती प्रेमानंद जी महाराज यांची अनुयायी आहे. तीची आरोपी सुंदरम राजपूतशी सोशल मीडियावर झाली. सुरुवातीला चॅटिंग केल्यानंतर दोघांची मैत्री झाली. या आरोपीने महिलेला तो महाराजांच्या भक्तांपैकी एक असून महाराजांची वैयक्तिक भेट घडवू शकतो.

समोर आलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी सुंदरमने पीडित महिलेला मेसेज पाठवला, त्यात त्याने मी थेट दर्शनाची व्यवस्था करेल अशी माहिती दिली. एक महिन्यानंतर 12 सप्टेंबर रोजी आरोपीने महिलेला भेट आयोजित केल्याची माहिती दिली. त्यानंतर ही महिला आपल्या भावासोबत वृंदावनला पोहोचली. त्यावेळी आरोपीने सांगितले की, आश्रम पुढे आहे, तिथे वाहनांना परवानगी नाही, त्यामुळे भावाने पार्किंगमध्येच गाडी घेऊन थांबावे लागेल. महिलेने ही गोष्ट मान्य केली.

हॉटेलमध्ये बलात्कार

यानंतर आरोपीने महिलेला मोटारसायकलवर बसवून आश्रमाऐवजी राधाकृष्ण धाम नावाच्या हॉटेलमध्ये नेले. या हॉटेलच्या रूमध्ये त्याने कॉफी मागवली आणि त्यात ड्रग्ज मिसळले. कॉफी पिल्यानंतर महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले. तसेच हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दिला ब्लॅकमेल केले, तसेच तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.

आरोपीला अटक

या त्रालाला कंटाळून आरोपी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आता पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच सुंदरमला देवराहा बाबा घाट रोडवरून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पोलीस डिजिटल पुरावे गोळा करत आहेत. तसेच व्हिडिओ आणि चॅट रेकॉर्डिंग जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.