VIDEO : गाडी चालवता चालवता चालकाला हृदयविकाराचा झटका आला, बस अनियंत्रित झाली अन्…

| Updated on: Dec 03, 2022 | 6:41 PM

बसने रिक्षा, दुचाकींना धडक दिल्याने यात अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

VIDEO : गाडी चालवता चालवता चालकाला हृदयविकाराचा झटका आला, बस अनियंत्रित झाली अन्...
गाडी चालवताना बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला अन्...
Image Credit source: social
Follow us on

जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये अपघाताची एक धक्कादायक घटना घडली आहे. गाडी चालवता चालवता चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बस अनियंत्रित झाल्याने बसने सहा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दमोह नाका परिसरातील सिग्नलवर ही थरारक घटना घडली आहे. अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

50 प्रवाशांनी भरलेल्या बसने वाहनांना चिरडले

जबलपूरमधील दमोह परिसरातील सिग्नलला गाड्या थांबल्या होत्या. यावेळी एक अनियंत्रित प्रवासी बस आली आणि सिग्नलला उभ्या असलेल्या गाड्यांना चिरडत बस पुढे जाऊन थांबली. बसमध्येही 50 प्रवासी होते.

हे सुद्धा वाचा

अपघातात सहा जण जखमी, एक गंभीर

बसने रिक्षा, दुचाकींना धडक दिल्याने यात अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना सिग्नलवरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

चालकाचा जागीच मृत्यू

सुरवातीला लोकांना वाटले चालक नशेत असल्याने ही घटना घडली. मात्र जेव्हा बसमध्ये जाऊन पाहिले तेव्हा चालक बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. चालकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.