AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी-चिंचवडमध्ये 33 दिवसांमध्ये 7 खुनाच्या घटना!, गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

शहरातील गुन्हेगारीचा आलेख चढता असल्याचं वारंवार समोर येत आहे. गेल्या अवघ्या 33 दिवसांमध्ये सात जणांची हत्या झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 33 दिवसांमध्ये 7 खुनाच्या घटना!, गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढताचImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Dec 03, 2022 | 10:32 PM
Share

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दररोज घडणाऱ्या हत्या, मारामारीच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड हादरुन गेले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारी कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालली आहे. शहरातील गुन्हेगारीचा आलेख चढता असल्याचं वारंवार समोर येत आहे. गेल्या 33 दिवसात सात जणांच्या हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान

गुन्हेगारी आटोक्यात आणणे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस कोणती ठोस पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कालही पिंपरीत हत्याकांडाची घटना

पिंपरी-चिंचवड शहरात एका टोळक्याने सराईत गुन्हेराची हत्या केल्याची घटना काल घडली आहे. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेतील गुन्हेगारांकडे पिस्तुल आणि कोयते आले कुठून याचा पोलीस शोध घेत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी-चिंचवड शहर हे एक औद्योगिक नगरी आहे. चाकण, तळेगाव असा ग्रामीण भाग देखील पिंपरी-चिंचवडमध्ये येतो. औद्योगिक शहर असल्यामुळे लाखोंच्या संख्येत कामगार इथे आपलं पोट भरण्यासाठी येतात.

पण, गुन्हेगारीमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. जमिनीचे वाद, अनैतिक संबंध, लूटमार, दरोडा, बलात्कार, विनयभंग, हत्या अशा अनेक घटना घडत आहेत.

सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.