AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2026: ज्या राज्यांमध्ये निवडणुका तिथेच पायघड्या! तामिळनाडूपासून पश्चिम बंगालपर्यंत घोषणांचा पाऊसच पाऊस

Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी सर्वसाधारण अर्थसंकल्पात तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यांच्यासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा केली. आता या घोषणा काय आहेत वाचा...

Budget 2026: ज्या राज्यांमध्ये निवडणुका तिथेच पायघड्या! तामिळनाडूपासून पश्चिम बंगालपर्यंत घोषणांचा पाऊसच पाऊस
nirmala-sitharamanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 01, 2026 | 12:59 PM
Share

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत २०२६-२७ चा सामान्य अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. यंदा पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केरळ वगळता इतर चार राज्यांमध्ये मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणुका होऊ शकतात. या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली आहे.

रेअर अर्थ मिनरल्ससाठी डेडिकेटेड कॉरिडॉर

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात सांगितले की, ओडिसा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात समर्पित मिनरल पार्क बांधली जातील. याशिवाय, वाराणसी ते सिलीगुडीपर्यंत रेल कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच, केरळ आणि तमिळनाडूसह इतर राज्यांमध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा केली आहे.

तमिळनाडू, केरळसह चार राज्यांमध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर

रेअर अर्थ मिनरल्समध्ये चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चार राज्यांमध्ये (तमिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आंध्र प्रदेश) मिनरल्ससाठी डेडिकेटेड कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, “रेअर अर्थ परमानेंट मॅग्नेटची योजना नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आली होती.”

त्या पुढे म्हणाल्या, “आता आम्ही ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू सारख्या मिनरल-समृद्ध राज्यांना खाणकाम, प्रक्रिया, संशोधन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर स्थापन करण्यास मदत करण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत.”

वाराणसी ते सिलीगुडीपर्यंत रेल कॉरिडॉर

अर्थमंत्र्यांनी भारताच्या हाय-स्पीड रेल्वेच्या महत्वाकांक्षांना चालना देणारी घोषणा केली. अर्थसंकल्पात सात हाय-स्पीड रेल कॉरिडॉरचा प्रस्ताव ठेवला आहे. याचा उद्देश टियर-२ आणि टियर-३ शहरांना मोठ्या शहरी केंद्रांशी जोडणे, रेल्वेला रस्ते आणि कमी अंतराच्या हवाई प्रवासाचा स्वच्छ, वेगवान पर्याय म्हणून पुन्हा स्थापित करणे आहे.

अर्थसंकल्पानुसार, पुणे-मुंबई, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू, बंगळुरू-चेन्नई, हैदराबाद-चेन्नई, दिल्ली-वाराणसी, वाराणसी-सिलीगुडी या मार्गांना ग्रोथ कनेक्टर म्हणून विकसित केले जाईल. तसेच येथे रेल कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव आहे. हे कॉरिडॉर पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि पूर्व भागांना जोडतात. यामुळे औद्योगिक हब, टेक्नॉलॉजी सेंटर, तीर्थक्षेत्रे आणि उदयोन्मुख शहरी समूहांना जलद, अधिक एकात्मिक नेटवर्कमध्ये आणणे. याशिवाय, अर्थमंत्र्यांनी दुर्गापूरला उत्तर-पूर्व औद्योगिक कॉरिडॉरशी जोडण्याची घोषणा केली.

पूर्व भारतात ऑल इंडिया इंस्टीट्यूट फॉर डिझायनिंग

निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, सरकार ICAI, ICSI सारख्या व्यावसायिक संस्थांना शॉर्ट टर्म मॉड्युलर कोर्स डिझाइन करण्यास मदत करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. त्यांनी सांगितले की, खासगी भागीदारीत ५ मेडिकल हब तयार केले जातील. भारतात ३ नवीन ऑल इंडिया इंस्टीट्यूट फॉर आयुर्वेद स्थापन केले जातील. मेडिकल टुरिझमसाठी इन्फ्रास्ट्रक्चर विकसित केले जाईल. तसेच, पूर्व भारतात ऑल इंडिया इंस्टीट्यूट फॉर डिझायनिंग स्थापन करण्याची घोषणा केली. उच्च शिक्षणात महिलांच्या सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृहे बांधली जातील.

Follow Us
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग
हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप
Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर
एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं
Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष