CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर देशभरात चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)ची महत्त्वाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीसह आगामी आंदोलनांची रणनीती आणि धोरणांवर सविस्तर चर्चा होणार आहे. आंदोलनानंतरची ही पहिली मोठी संघटनात्मक बैठक असल्याने तिच्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन उभे करण्यात CJP ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलनानंतर सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला, ज्याला CJP ने आपल्या आंदोलनाचे मोठे यश मानले आहे.
आंदोलनानंतर उपचार पूर्ण करून अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असून, त्यांचे समर्थक आणि कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची दोन दिवसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा, संघटन विस्तार, आगामी आंदोलनांची रूपरेषा तसेच E20 इंधनाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका यावर चर्चा होणार आहे. CJP च्या भविष्यातील आंदोलनांची रणनीती आणि राष्ट्रीय स्तरावरील विस्ताराचा रोडमॅपही यावेळी निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर मिळाल्याचा दावा केला होता. मात्र, भाजपने हा दावा फेटाळून लावला होता. अशा पार्श्वभूमीवर CJP च्या या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि पक्षाची पुढील भूमिका काय असणार, याकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 05, 2026 11:03 AM
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...